-
आयपीएल भारतात अत्यंत चर्चेत असते आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. क्रिकेट प्रेमी या लीगची उत्सुकतेने वाट पाहत असतात पण यंदा डब्ल्यूपीएलसाठी ही प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला आहे.
-
17 मार्चला झालेल्या डब्ल्यूपीएलच्या अंतिम सामन्यात आरसीबी संघाने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून डब्ल्यूपीएल २०२४ चे विजेतेपद पटकावले.
-
विजेतेपदा सोबत आरसीबी संघाच्या खेळाडूंनी पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅप देखील जिंकली.
-
डब्ल्यूपीएल २०२४ मध्ये सर्वाधिक धावांसाठी एलिस पेरीने ऑरेंज कॅप जिंकली आहे. याशिवाय श्रेयंका पाटीलने आपल्या अप्रतिम कामगिरीसाठी सर्वाधिक विकेट्स घेऊन पर्पल कॅप जिंकली आहे.
-
डब्ल्यूपीएल 2024 अंतिम सामन्यात सोफी मोलिनक्स रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसाठी एका षटकात तीन विकेट्स घेतले. तिच्या या उत्कृष्ट गोलंदाजी कामगिरीसाठी चाहत्यांनी तिचं भरपूर कौतुक देखील केलं.
-
डब्ल्यूपीएल 2024 मध्ये आरसीबी संघाने अंतिमफेरी जिंकून इतिहास रचला आहे कारण अद्याप आयपीएलमध्ये तरी आरसीबी फ्रँचायझीला विजय मिळाली नव्हती.
-
आरसीबीला डब्ल्यूपीएलच्या विजेतेपदासाठी 6 कोटी रुपयांचं बक्षीस मिळालं आहे.
-
उपविजेता दिल्ली कॅपिटल्स संघाला 3 कोटी रुपये मिळाले.
-
सचिन तेंडुलकर, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल, हरभजन सिंग आणि इतर अनेक क्रिकेटपटूंनी स्मृती मानधनाच्या विशेष विजयाबद्दल तिला शुभेच्छा दिल्या आणि अभिनंदन केले.
-
(सर्व फोटो : आरसीबी अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)

मुलींनी अक्षरश: मर्यादाच ओलांडली! शाळेच्या गणवेशात हद्दच पार केली, VIDEO पाहून बसेल धक्का