-
श्रेयंका पाटीलने रविवारी महिला प्रीमियर लीग २०२४ च्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाला एक अविस्मरणीय जखम दिली. श्रेयंका पाटीलने अंतिम सामन्यात असे काही केले ज्याची दिल्ली कॅपिटल्स संघाने कल्पनाही केली नसेल.
-
श्रेयंका पाटील यांचा जन्म ३१ जुलै २००२ रोजी बंगळुरु, कर्नाटक येथे झाला. श्रेयंका पाटील विराट कोहलीला आपला आदर्श मानते.
-
वयाच्या ९व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. श्रेयंका पाटील ही उत्कृष्ट ऑफ स्पिन गोलंदाज आहे.
-
श्रेयंका पाटीलने भारतासाठी २ एकदिवसीय सामन्यात ४ बळी आणि ६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ८ बळी घेतले आहेत. परदेशी लीगसाठी करारावर स्वाक्षरी करणारी श्रेयंका पाटील ही पहिली अनकॅप्ड भारतीय महिला क्रिकेटपटू आहे. (Photo Source – WPL X)
-
गेल्या वर्षी महिला कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये श्रेयंका पाटीलला गयाना ॲमेझॉन वॉरियर्स संघाने विकत घेतले होते. श्रेयंका पाटीलने विजेतेपदाच्या लढतीत ४ विकेट घेत दिल्ली कॅपिटल्सचे कंबरडे मोडले. (Photo Source – WPL X)
-
या सामन्यात श्रेयंका पाटीलने शानदार गोलंदाजी करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला दिल्ली कॅपिटल्सवर वर्चस्व मिळवून दिले. या सामन्यात श्रेयंका पाटीलने ३.३ षटके टाकत १२ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. (Photo Source – WPL X)
-
श्रेयंका पाटीलने दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार मेग लॅनिंग (२३), मिन्नू मणी (५), अनुरुंधती रेड्डी (१०) आणि तानिया भाटिया (०) यांना अंतिम सामन्यात बाद केले. (Photo Source – WPL X)
-
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या श्रेयंका पाटीलला डब्ल्यूपीएल २०२४ स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेतल्याबद्दल पर्पल कॅप आणि ५ लाख रुपये मिळाले आहेत. (Photo Source – WPL X)
-
डब्ल्यूपीएल २०२४ मध्ये श्रेयंका पाटीलने सर्वाधिक १३ विकेट घेतल्या आहेत. श्रेयंकाला उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कारही मिळाला. त्यासाठी तिला पाच लाख रुपये मिळाले. (Photo Source – WPL X)

Sujata Karthikeyan : भाजपाची सत्ता येताच दिला राजीनामा; स्वेच्छा निवृत्ती स्वीकारणाऱ्या IAS अधिकारी सुजाता कार्तिकेयन कोण?