-
इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा पहिला सामना २२ मार्च रोजी चेन्नईमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात पार पडणार आहे.
-
२०२४ ची आवृत्ती सुरू होण्यापूर्वी आयपीएलच्या इतिहासातील खेळाडूंच्या सर्वोच्च विक्रमांबद्दल जाणून घेऊया.
-
आरसीबी चा उत्कृष्ट फलंदाज विराट कोहलीने आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा केल्या असून विराटच्या नावावर ७२६३ धावांची नोंद आहे.
-
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा आणखीन एक खेळाडू म्हणजे शिखर धवन. शिखरच्या नावावर ६६१७ धावांची नोंद आहे. सोबतच डेव्हिड वॉर्नरच्या ही आपल्या आयपीएल करकीर्दीमध्ये ६३९७ धावा आहेत.
-
मुंबई इंडियन्सचा सर्वोत्तम फलंदाज आणि माजी कर्णधार रोहित शर्माने याचे आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण ६२११ धावा आहेत.
-
आपल्या उत्कृष्ट गोलंदाजी कामगिरीने युजवेंद्र चहलने आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स घेतेले आहेत. युजवेंद्रने एकूण १८७ विकेट्स घेतले आहेत.
-
ड्वेन ब्राव्होने आयपीएलमध्ये १८३ विकेट घेतले आहेत.
-
धावांव्यतिरिक्त काही खेळाडूंनी आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार देखील मारले आहेत.
-
ख्रिस गेलच्या नावावर आयपीएलमध्ये एकूण ३५७ षटकारांची नोंद आहे.
-
आयपीएलमध्ये एकूण २५७ षटकारांसह या यादी मध्ये रोहित शर्माचे नाव देखील सामील आहे.
-
आयपीएल चा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणजे एमएस धोनीने आपल्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत एकूण २३९ षटकार मारले आहेत.
-
शिखर धवनच्या नावावर आयपीएलमध्ये सारधिक चौकारांची नोंद आहे. शिखरने आतापर्यंत ७५० चौकार मारले आहेत. (सर्व फोटो : आयपीएल अधिकृत पेज)

मुलींनी अक्षरश: मर्यादाच ओलांडली! शाळेच्या गणवेशात हद्दच पार केली, VIDEO पाहून बसेल धक्का