-
भारतात क्रिकेट आणि राजकारण यांचा खूप जवळचा संबंध आहे. असे अनेक क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी राजकारणातही कमाल करून दाखवली आहे. (Pexels)
-
आज आपण अशा काही क्रिकेटपटूंबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी लोकसभा निवडणूक लढवल्या आहेत. यातील कोणत्या क्रिकेटपटूंना यश मिळाले आणि कोणाला अपयश, हे जाणून घेऊया. (Pexels)
-
अष्टपैलू क्रिकेटपटू यूसुफ पठनला तृणमूल काँग्रेसने बहरामपुर येथून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तिकीट दिले आहे. (Yusuf/Instagram)
-
कीर्ती आझाद हे १९८३ साली विश्वचषक जिंकणाऱ्या क्रिकेट संघाचे सदस्य होते. २००४, २००९ आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ते भाजपाच्या तिकीटावर जिंकून आले होते. २०१५ साली ते काँग्रेसमध्ये सहभागी झाले. २०१९ साली ते निवडणूक हरले. यावर्षी ते TMC च्या तिकीटावर निवडणूक लढवणार आहेत. (PTI)
-
भारताच्या टेस्ट कर्णधार पदावरून हटवण्यात आल्यानंतर मंसूर अली खान पतौडी यांनी गुडगाव येथून लोकसभा निवडणूक लढवली. मात्र ते हरले. यानंतर तब्बल २० वर्षानंतर त्यांनी पुन्हा एकदा निवडणूक लढवली, मात्र, त्यांना यावेळीही यश मिळाले नाही. (AP)
-
चेतन चौहान यांनी भाजपाच्या तिकिटावर १९९१ आणि १९९८ साली अमरोहा येथून लोकसभा निवडणूक लढवली आणि यश मिळवले. ते १९९६, १९९९ आणि २००४ सालीही निवडणुकीला उभे राहिले होते, मात्र त्यांना हार पत्करावी लागली. (PTI)
-
आसामच्या महिला क्रिकेट संघाच्या कप्तान राहिलेल्या राणी नाराह यांनी काँग्रेसच्या तिकीटावर १९९८, १९९९ आणि २००९ साली लखीमपुर येथून ओकसभ्य निवडणूक लढवली आहे ती जिंकलीही. (Wikipedia)
-
१९८७ साली झालेल्या विश्वचषकात हॅट्रिक करणारे माजी वेगवान गोलंदाज चेतन शर्मा यांनी २००९ साली बसपाच्या तिकिटावर फरीदाबाद येथून निवडणूक लढवली, मात्र त्यांना विजय मिळाला नाही. (Indian Express)
-
अष्टपैलू क्रिकेटपटू मनोज प्रभाकर यांनी १९९६ साली ‘ऑल इंडिया इंदिरा काँग्रेस (तिवारी)’च्या तिकीटावर दिल्लीतून निवडणूक लढवली. मात्र त्यांना केवळ ३% मतं मिळाली. (Indian Express)
-
माजी अंडर-१९ क्रिकेटर रंजीब बिस्वाल यांनी १९९६ आणि १९९८ साली काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली आणि जिंकली. २०१४ साली ते केंद्रपाडा सीटवर खासदार म्हणून निवडले गेले होते. (Facebook)
-
लोकप्रिय क्रिकेटपटू नवज्योत सिद्धू २००४, २००७ आणि २००९ साली अमृतसरचे खासदार होते. सध्या ते काँग्रेसमध्ये आहेत. (Indian Express)
-
रणजी मॅच खेळलेले अनुराग ठाकूर १९९८ पासून सातत्याने हमीरपूर येथून निवडणूक जिंकून खासदार बनत आहेत. (Indian Express)
-
मॅच फिक्सिंगच्या प्रकरणात अडकलेले माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी २००९ साली मुरदाबाद येथून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली आणि जिंकलीही. मात्र, २०१४ साली त्यांना विजय प्राप्त करता आला नाही.
-
माजी क्रिकेटपटू अश्विनी मिन्ना यांनी २०१४ साली करनाल येथून भाजपासाठी विजय मिळवला. (screengrab)
-
भारताच्या सर्वोत्कृष्ट फील्डर्सपैकी एक असलेल्या मोहम्मद कैफ यांनी २०१४ साली निवडणूक लढवली मात्र त्यांना हार पत्करावी लागली. (Twitter)
-
भारताला २००७ आली २०११ साली विश्वचषक मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा असलेल्या गौतम गंभीरने २०१९ साली पूर्व दिल्ली येथून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक जिंकली. मात्र, २०२४च्या निवडणुकीआधीच त्याने राजकारणाला रामराम केला. (Twitter)
जिनिलीया वहिनींना पुरणपोळ्या बनवता येतात का? रितेश देशमुखचं उत्तर ऐकताच पिकला हशा; म्हणाला, “घरात मी गुलाम…”