-
आयपीएल २०२४ च्या हंगामाला २२ मार्चपासून सुरुवात झाली आहे. आतापर्यंत प्रत्येक संघांनी एक तरी सामना खेळला आहे. आज आपण या सर्व संघाचे कोच कोण आहेत? जाणून घेणार आहोत. . (फोटो सौजन्य -आयपीएल एक्स)
-
आयपीएल २०२४ मध्ये, ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी न्यूझीलंडचे माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग यांच्याकडे सोपवण्यात आली आहे, जे २००९ च्या आयपीएल हंगामापासून मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळत आहे. त्यांच्या कोचिंगमध्ये चेन्नईने एकूण ५ ट्रॉफी जिंकल्या आहेत. (फोटो सौजन्य – सीएसके एक्स)
-
भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज आशिष नेहरा आयपीएल २०२४ मध्ये गुजरात टायटन्सच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी पार पाडत आहे. जो २०२२ च्या हंगामात आयपीएल पदार्पण संघ गुजरात टायटन्समध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून सामील झाला होता आणि पहिल्याच सत्रात त्याने ट्रॉफी जिंकली होती. (फोटो सौजन्य – जीटी एक्स)
-
आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या मुंबई इंडियन्समध्ये, आयपीएल २०२४ दरम्यान मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी मार्क बाउचर यांच्या खांद्यावर आहे. जो आयपीएल २०२३ हंगामात मुंबईचे मुख्य प्रशिक्षक म्हणून सामील झाला होता. (फोटो सौजन्य – एमआय एक्स)
-
आयपीएल २०२४ मध्ये अँडी फ्लॉवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका साकारताना दिसत आहे. या वर्षी ऑगस्ट महिन्यात बंगळुरूने संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती केली होती. अँडी फ्लॉवरने संजय बांगरच्या जागी मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली. (फोटो सौजन्य – आरसीबी एक्स)
-
आयपीएल २०२३ च्या समाप्तीनंतर, लखनऊ सुपर जायंट्सने जस्टिन लँगर यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती, ज्यांनी अँडी फ्लॉवरच्या जागी मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. (फोटो सौजन्य – एलएसजी एक्स)
-
आयपीएल २०२४ मध्ये, डॅनियल व्हिटोरी सनरायझर्स हैदराबादसाठी मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावताना दिसत आहेत, ज्याला आयपीएल २०२३ नंतर मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले होते. ब्रायन लारानंतर डॅनियलला एसआरएचचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. (फोटो सौजन्य – एसआरएच एक्स)
-
आयपीएल २०२४ मध्ये, डॅनियल व्हिटोरी सनरायझर्स हैदराबादसाठी मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावताना दिसत आहेत, ज्याला आयपीएल २०२३ नंतर मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले होते. ब्रायन लारानंतर डॅनियलला एसआरएचचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. (फोटो सौजन्य – डीसी एक्स)
-
श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी दिग्गज कुमार संगकारा आयपीएल २०२४ मध्ये राजस्थान रॉयल्सचे प्रशिक्षक म्हणून भूमिका पार पाडता आहे, जो आयपीएल २०२१ हंगामात राजस्थान रॉयल्सचा मुख्य प्रशिक्षक म्हणून सामील झाला होता. (फोटो सौजन्य – आरआर एक्स)
-
चंद्रकांत पंडित हे २०२२ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून सामील झाले होते. ते आयपीएल २०२४ मध्येही मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहेत. (फोटो सौजन्य – केकेआर एक्स)
-
ट्रेवर बेलिस २०२२ च्या आयपीएल हंगामानंतर पंजाब किंग्जचे मुख्य प्रशिक्षक म्हणून सामील झाले होते. ते या हंगामातही पंजाब संघाचे प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडताना दिसत आहेत. (फोटो सौजन्य – पीबीकेएस एक्स)

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”