-
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने गुरवारी झालेल्या सामन्यामध्ये दिल्ली फ्रँचायझीसह आपल्या कारकिर्दीत एका विशेष विक्रमाची नोंद केली आहे.
-
आतापर्यंत हा विक्रम आयपीएलमध्ये फक्त विराट कोहली, सुरेश रैना, हरभजन सिंग, गौतम गंभीर, अजिंक्य राहणे आणि भुवनेश्वर कुमार या खेळाडूंनीच केला आहे.
-
ऋषभ पंत हा इंडियन प्रीमियर लीगच्या १०० सामन्यांमध्ये खेळणार दिल्लीच्या संघातील पहिला खेळाडू ठरला आहे.
-
जयपूरमध्ये झालेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान ऋषभ पंतने हा विक्रम आपल्या नावावर केला.
-
ऋषभ पंतने २०१५ मध्ये दिल्ली कॅपिटल्ससह आयपीएलमध्ये पदार्पण केले होते आणि २०२२ मध्ये त्याला संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले.
-
ऋषभ पंतच्या कार अपघातानंतर 14 महिन्यांनी त्याने आयपीएल २०२४मधून पुनरागमन केले आहे.
-
आपल्या फिटनेसह ऋषभ पंतने दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी देखील घेतली आहे.
-
आयपीएलमध्ये १०० सामने खेळणारा ऋषभ पंत हा दिल्ली कॅपिटल्सचा पहिला खेळाडू बनला असून तो विराट कोहली आणि गौतम गंभीरसह या यादीत सामील झाला आहे.
-
(सर्व फोटो : ऋषभ पंत/इन्स्टाग्राम)

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य