-
चेन्नई सुपर किंग्स
आयपीएल २०२४ साठी चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात एकापेक्षा एक जबरदस्त खेळाडू आहेत. पण त्याचसोबत संघात अनेक मराठमोळे खेळाडू आहेत. (फोटो सौजन्य:चेन्नई सुपर किंग्स इन्स्टाग्राम) -
मराठमोळे खेळाडू
चेन्नईच्या ताफ्यात ऋतुराज गायकवाड, राजवर्धन हंगारगेकर, अजिंक्य रहाणे, शार्दुल ठाकूर आणि तुषार देशपांडे हे मराठमोळे खेळाडू आहेत.(फोटो सौजन्य:चेन्नई सुपर किंग्स इन्स्टाग्राम) -
ऋतुराज गायकवाड
चेन्नई संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड हा महाराष्ट्र संघाचा उत्कृष्ट फलंदाज आहे. ऋतुराजने २०२० मध्ये चेन्नईकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि पुढच्याच वर्षी म्हणजे २०२१ मध्ये तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. (फोटो सौजन्य:चेन्नई सुपर किंग्स इन्स्टाग्राम) -
राजवर्धन हंगारगेकर
मराठमोळा गोलंदाज राजवर्धन हंगारगेकरदेखील चेन्नईच्या ताफ्यात आहे. २०२२ च्या मेगा लिलावात चेन्नईने त्याला खरेदी केले. आतापर्यंत त्याने दोन सामने खेळले असून ३ विकेटस घेतल्या आहेत. (फोटो सौजन्य:आयपीएल एक्स) -
अजिंक्य रहाणे
२००८ पासून आयपीएलचा तगडा अुनभव असलेला मराठमोळा फलंदाज अजिंक्य रहाणे चेन्नई संघाचा भाग आहे. आयपीएल २०२३ मध्ये त्याने संघासाठी शानदार फलंदाजी करत आपला अनुभव दाखवून दिला. (फोटो सौजन्य:चेन्नई सुपर किंग्स इन्स्टाग्राम) -
शार्दुल ठाकूर
मुंबईचा अष्टपैलू खेळाडू मराठमोळा शार्दुल ठाकूरही चेन्नईच्या ताफ्यात परतला आहे. २०१८ ते २०२१ मध्ये ठाकूर चेन्नई संघाचा भाग होता, त्यानंतर तो केकेआरच्या संघात गेला. पण आयपीएल २०२३ च्या मिनी लिलावात चेन्नईने पुन्हा शार्दुल ठाकूरवर बोली लावत त्याला पुन्हा संघात घेतले. (फोटो सौजन्य:चेन्नई सुपर किंग्स इन्स्टाग्राम)

महाराष्ट्राचा मराठमोळा गोलंदाज तुषार देशपांडेही चेन्नई संघाचा महत्त्वाचा गोलंदाज आहे. २०२२ च्या आयपीएल लिलावात देशपांडेला संघात सामील केले. २०२३ च्या आयपीएलमध्ये पर्पल कॅपच्या शर्यतीत असणाऱ्या देशपांडेने १६ सामन्यांत २१ विकेट्स मिळवल्या. (फोटो सौजन्य:चेन्नई सुपर किंग्स इन्स्टाग्राम)