-
आयपीएल दरम्यान खेळाडूंकधून अनेक विक्रम होत असतात किंवा आधीच्या दिग्गज खेळाडूंचे विक्रम मोडून नवीन विक्रमांची नोंद होत असते. आयपीएल ट्रॉफी शिवाय या स्पर्धेमध्ये आणखीन एक चर्चित गोष्ट म्हणजे ऑरेंज आणि परपल कॅप.
-
यंदाच्या आयपीएल सीजनमध्ये आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली २०३ धावसंख्यासह ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे. तर ७ विकेट्ससह पर्पल कॅपची कमान सीएसकेचा वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमानकडे आहे. जाणून घेऊया या शर्यतीतल्या पहिल्या पांच खेळाडूंबद्दल.
-
हैदराबादचा फलंदाज हेनरिक क्लासेन १६७ धावांसह या यादीत तिसरा क्रमांकावर आहे.
-
लखनऊ सुपर जायंट्सचा फलंदाज क्विंटन डी कॉक १३९ धावांसह पाचव्या क्रमांकावर आहे.
-
एलएसजीचा वेगवान गोलंदाज मयंक यादव पर्पल कॅपच्या शर्यतीत ६ विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे.






