India Uncapped Bowlers Who Take 5 Wickets Haul in IPL: लखनौ सुपर जायंट्स वि गुजरात टायटन्सच्या सामन्यात एलएसजीचा गोलंदाज यश ठाकूरने ५ विकेट्स घेत संघाला शानदार विजय मिळवून दिला. यशच्या आधी कोणकोणत्या अनकॅप्ड खेळाडूंनी आयपीएलमध्ये ५ विकेट्स घेतले आहेत, याचा आढावा घेऊया.
-
आकाश मढवाल
मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज आकाश मढवालने आयपीएलमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी केली आहे. गेल्या मोसमात त्याने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध अवघ्या ५ धावा देत ५ विकेट घेतले होते. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर मुंबईने एलिमिनेटर सामन्यात विजय मिळवला होता. (फोटो:मुंबई इंडियन्स) -
अंकित राजपूत
किंग्स इलेव्हन पंजाब म्हणजे आताचा पंजाब किंग्सकडून खेळताना युपीचा गोलंदाज अंकित राजपूतने ५ विकेट्स घेतले होते. आयपीएलच्या ११व्या हंगामात हैदराबादविरूद्धच्या सामन्यात १४ धावा देत ५ विकेट्स घेतले होते. (फोटो:इंडियन एक्सप्रेस) -
वरूण चक्रवर्ती
कोलकाता नाईट रायडर्सचा फिरकीपटू वरूण चक्रवर्तीने भारतासाठी पदार्पण करण्यापूर्वी आयपीएलमध्ये ५ विकेट्स घेतले होते. वरुणने आयपीएल २०२० मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध फक्त २० धावा देत ५ विकेट घेतल्या. (फोटो:केकेआर) -
उमरान मलिक
आयपीएलमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकणारा भारताचा गोलंदाज म्हणून ओळख असलेला उमरान मलिक याने आयपीएल २०२२ मध्ये गुजरात टायटन्स विरूद्ध सनरायझर्स हैदराबादच्या सामन्यात २५ धावा देत ५ विकेट्स घेतले होते. (फोटो:सनरायझर्स हैदराबाद) -
हर्षल पटेल
सध्या पंजाब किंग्स संघाचा भाग असलेला वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने आरसीबीकडून खेळताना ५ विकेट्स घेतले होते. आयपीएल २०२१ मध्ये पटेलने मुंबई इंडियन्सविरूद्ध २७ धावा देत ५ विकेट्स घेतले होते. (फोटो:एक्स) -
यश ठाकूर
लखनौचा वेगवान गोलंदाज यश ठाकूरने गुजरात टायटन्सविरूद्धच्या सामन्यात भेदक गोलंदाजी केली. या गोलंदाजीसह या विदर्भवीराने आयपीएलमध्ये पहिल्यांदाच ५ विकेट्स घेतले आणि ३० धावा दिल्या. (फोटो:लखनौ सुपर जायंट्स) -
अर्शदीप सिंग
आयपीएलमध्ये पंजाब किंग्जकडून खेळणाऱ्या अर्शदीप सिंगने २०२१ च्या मोसमात राजस्थान रॉयल्सविरुद्ध ३२ धावा देत २ विकेट घेतले होते. (फोटो:पंजाब किंग्स)