-
अर्शदीप सिंग
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध अर्शदीप सिंगने अप्रतिम गोलंदाजी करत एकाच षटकात हैदराबादला दोन मोठे धक्के दिले.यासह त्याने ४ षटकांत २९ धावा देत ४ विकेट्स घेतले. -
४ विकेट्स
अर्शदीपने एकाच षटकात आधी ट्रॅव्हिस हेड आणि नंतर एडन मारक्रमला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तर पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई करणाऱ्या नितीश रेड्डीला आणि अब्दुल समद यांना झेलबाद केले. -
विक्रम
हैदराबादविरूद्ध या कामगिरीसह अर्शदीपच्या नावावर टी-२० क्रिकेटमध्ये एका खास विक्रमाची नोंद झाली आहे. अर्शदीपने टी-२० क्रिकेटमध्ये १५० विकेट पूर्ण केले आहेत. -
१२३ सामने
अर्शदीपने आपल्या १२३व्या सामन्यात १५० टी-२० विकेट पूर्ण केल्या आहेत. -
पॅट कमिन्स
आता अर्शदीपने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सलाही मागे टाकले आहे. पॅट कमिन्सेन १३४ टी-२० सामन्यांमध्ये १५० टी-२० विकेट पूर्ण केले. -
परपल कॅप
हैदराबादविरूद्धच्या सामन्यातील ४ विकेट्सच्या कामगिरीसह अर्शदीपने यंदाच्या मोसमातील पर्पल कॅपच्या शर्यतीत मोठी झेप घेतली आहे. -
तिसरा
अर्शदीपने ५ सामन्यांमध्ये २० च्या सरासरीने ८ विकेट्स घेतल्या आहेत आणि सध्या तो तिसऱ्या स्थानावर आहे. -
बरोबरी
पर्पल कॅपच्या शर्यतीत ८ विकेट्ससह अर्शदीपने तिसऱ्या स्थानावर पोहोचत युजवेंद्र चहलची बरोबरी केली आहे. -
पर्पल कॅप
२२ सामन्यांनंतर आयपीएलच्या पर्पल कॅप शर्यतीत सीएसकेतचा मुस्तफिजूर रहमान ९ विकेट्सह पहिला आहे, तर राजस्थानचा चहल ८ विकेट्सह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”