-
क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्याला तब्बल ४.३ कोटींचा चुना लागला आहे. आणि ही फसवणूक खुद्द त्यांच्या भावाने केली आहे.
-
हार्दिक आणि कृणालच्या भावाचे नाव वैभव पंड्या असून तो त्यांचा सावत्र भाऊ आहे. मात्र हे नेमके प्रकरण काय आहे आणि यामध्ये हार्दिक, कृणालची कशी फसवणूक झाली हे जाणून घेऊया.
-
वैभववर फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार करून हार्दिक, कृणालची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
-
वैभवसोबत हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या यांची एका व्यवसायात भागीदारी होती. २०२१ मध्ये तिघांनी मिळून पॉलिमर व्यवसाय सुरू केला.
-
यामध्ये हार्दिक आणि कृणाल यांचा प्रत्येकी ४० टक्के तर वैभवचा २० टक्के वाटा होता. भागीदारीची अट होती की हार्दिक आणि कृणाल प्रत्येकी ४० टक्के भांडवल देतील.
-
तर वैभव २० टक्के भाग देईल आणि फर्म चालवण्याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारेल. व्यवसायातून मिळणारा नफाही त्याच प्रमाणात वाटून घ्यायचा होता.
-
हा नफा प्रत्येक व्यक्तीच्या या व्यवसायातील सहभागानुसार वाटून घ्यायचा होता. मात्र वैभवने तसे केले नाही.
-
कंपनीचा नफा आपल्या भावांना देण्याऐवजी वैभवने वेगळी कंपनी स्थापन करून ती त्याच्याकडे हस्तांतरित करून व्यवसायाच्या भागीदारी कराराचे उल्लंघन केले.
-
वैभवने हार्दिक आणि कृणालला न सांगता त्याच व्यवसायात दुसरी फर्म सुरू केली. काही मीडिया रिपोर्टनुसार वैभवच्या या कृतीमुळे कंपनीचे ३ कोटींचे नुकसान झाले.
-
वैभवने कोणालाही न कळवता त्याचा नफा २० टक्के वरून ३३.३टक्क्यांपर्यंत वाढवला. या अफरातफरीमुळे हार्दिक आणि कृणालचे ४.३ कोटी रुपयांचे नुकसान झाले.
-
इतकेच नाही तर वैभवने भागीदारी असलेल्या फर्मच्या खात्यातून लाखो रुपये स्वतःच्या खात्यात वळवून एक कोटी रुपये काढून घेतल्याचाही आरोप आहे.
-
दरम्यान, काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंड्या कुटुंबाच्या प्रत्येक फंक्शनमध्ये वैभव दिसतो. संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर तो हार्दिक आणि कृणालप्रमाणेच अतिशय आरामदायक जीवन जगतो. तो हार्दिक आणि कृणालच्या खूप जवळ आहे.
-
गेल्या वर्षी, हार्दिकची पत्नी नताशाने पंड्या कुटुंबाचे प्रश्न-उत्तर एक मजेशीर सत्र शेअर केले होते, ज्यामध्ये नताशा, कृणाल आणि पत्नी पंखुरी व्यतिरिक्त, वैभव आणि गौरव पंड्या देखील सहभागी झाले होते.
-
यावेळी पंड्या कुटुंबीय खूप काही बोलले. त्यांनी चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी नताशाने सांगितले होते की, हे संपूर्ण कुटुंब एकाच घरात राहते.
-
त्या सत्रात वैभवने सांगितले होते की, हार्दिक आणि कृणालसोबत त्याचे बाँडिंग खूपच चांगले आहे. त्याला घरातूनच खूप प्रेरणा मिळते. त्याने हार्दिक आणि त्याच्या भावाचा संपूर्ण संघर्ष त्यांनी पाहिला आहे.
-
त्याचे म्हणणे होते की दोन्ही भाऊ परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळतात. यावेळी नताशाचेही वैभवसोबत चांगले बॉन्डिंग दिसले. वैभव अनेकदा स्टेडियममध्ये हार्दिक आणि क्रुणालला सपोर्ट करताना दिसला. (All Photos: Vaibhav Pandya/Instagram)

Video: “त्याला फाशी द्या, पण नाण्याची दुसरी बाजू…”, आरोपी दत्ता गाडेच्या भावाने मांडली धक्कादायक भूमिका