-
या सामन्यात जसप्रीत बुमराहने तिसरी विकेट घेताच. तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. (Photo Source – IPL X)
-
या सामन्यापूर्वी त्याच्या नावावर २४ विकेट्स होत्या. आता आरसीबीविरुद्ध बुमराहच्या नावावर २९ विकेट्स आहेत. (Photo Source – MI X)
-
बुमराहने या प्रकरणात संदीप शर्मा आणि रवींद्र जडेजाला मागे टाकले आहे. या स्पेलसह बुमराहने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. (Photo Source – IPL X)
-
या संघाविरुद्ध आयपीएलमध्ये ५ बळी घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे. बुमराह व्यतिरिक्त आजपर्यंत इतर कोणत्याही गोलंदाजाला ही कामगिरी करता आलेली नाही. (Photo Source – IPL X)
-
जसप्रीत बुमराह आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी ५ विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. लसिथ मलिंगा आणि हरभजन सिंग यांनीही मुंबईकडून खेळताना ५ विकेट्स घेण्यात यश मिळवले. (Photo Source – MI X)
-
आतापर्यंत आयपीएल स्पर्धेत जसप्रीत बुमराहने आरसीबीचा स्टार फलंदाजा विराट कोहलीला पाचव्यांदा बाद केले आहे. विशेष म्हणजे बुमराहने आपल्या आयपीएल कारकीर्दीतील पहिली विकेटही विराटचीच घेतली होती.
-
मलिंगा-हरभजनशिवाय मुनाफ पटेल, आकाश मधवाल आणि अल्झारी जोसेफ यांनीही मुंबईसाठी ही कामगिरी केली आहे. जसप्रीत बुमराहने आयपीएल २०२४ मध्ये पर्पल कॅपधारकही बनला आहे. मिळवली आहे. (Photo Source – IPL X)
-
त्याच्या नावावर ५ सामन्यात १० विकेट्स आहेत. या मोसमात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत बुमराहनंतर राजस्थान रॉयल्सचा युजवेंद्र चहल आहे. (Photo Source – IPL X)
-
त्याने आतापर्यंत १० विकेट्सही घेतल्या आहेत. मुस्तफिजुर रहमान ९ विकेट्ससह तिसऱ्या स्थानावर आहे. (Photo Source – IPL X)
![Items in your kitchen that are linked to Cancer World Cancer Day 2025](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-24.jpg?w=300&h=200&crop=1)
महिलांनो कॅन्सरपासून वाचायंच असेल तर स्वयंपाक घरातील “ही” भांडी आताच बाहेर काढून टाका