-
ऋषभ पंत: ऋषभ पंत आयपीएलमध्ये सर्वात जलद ३००० धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. चेंडूंच्या बाबतीत त्याने हा आकडा सर्वात जलद गाठला. दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधाराने २०२८ चेंडूत ३००० धावांचा टप्पा गाठला. (Photo Source -DC X)
-
युसूफ पठाण: आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या युसूफ पठाणने आयपीएलमध्ये खेळताना २०८२ चेंडूत ३००० धावांचा टप्पा गाठला होता. पंतच्या आधी आयपीएलमध्ये सर्वात जलद ३०० धावा करणारा भारतीय फलंदाज युसूफ पठाण होता. (Photo Source -Yusuf Pathan X)
-
सूर्यकुमार यादव: काही काळ मुंबई इंडियन्सकडून खेळणारा सूर्यकुमार यादव त्याच्या स्फोटक फलंदाजीसोबतच असामान्य फटके मारण्यासाठी ओळखला जातो. सूर्याने आयपीएलमध्ये २१३० चेंडूत ३००० धावा करण्याचा पराक्रम केला होता. (Photo Source -IPL X)
-
सुरेश रैना : मिस्टर आयपीएल म्हटल्या जाणाऱ्या सुरेशने टूर्नामेंटमध्ये २१३५ चेंडूत ३०० धावांचा आकडा पार केला. चेन्नई सुपर किंग्जसाठी रैना हा महत्त्वाचा खेळाडू राहिला आहे. (Photo Source -Suresh Raina X)
-
एमएस धोनी: चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार एमएस धोनीने आयपीएलमध्ये २१५२ चेंडूत ३००० धावांचा आकडा गाठला होता. या मोसमात धोनी यष्टिरक्षक फलंदाज म्हणून खेळत आहे. (Photo Source – CSK X)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”