-
रोहित शर्मा
रोहित शर्माने डेक्कन चार्जर्स संघातून आयपीएल कारकिर्दीला सुरूवात केली. २०११ मध्ये रोहित मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला. कर्णधार म्हणून ५ आणि एकूण ६ आयपीएल विजेतेपद पटकावणारा रोहित एकमेव खेळाडू आहे. -
विराट कोहली
आयपीएलच्या इतिहासात विराट कोहली हा एकमेव खेळाडू आहे, जो १७ वर्षे एकाच संघाचा भाग राहिला आहे. २००८ मध्ये विराट कोहलीने आरसीबीकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. आयपीएळ ७००० धावा करणारा विराट एकमेव खेळाडू आहे पण एकदाही त्याच्या संघाने या लीगचे जेतेपद पटकावले नाही. -
एम एस धोनी
आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक महेंद्रसिंग धोनी ४२ वर्षांचा असून अजूनही आयपीएलमध्ये खेळत आहे. गेल्या मोसमातही त्याच्या नेतृत्वाखाली संघ चॅम्पियन झाला होता. चेन्नई संघाचा खेळाडू असलेला धोनी सीएसकेवरील बंदीमुळे २०१६ आणि २०१७ च्या मोसमात रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळला. -
शिखर धवन
पंजाब किंग्स संघाचा कर्णधार असलेला शिखर धवनने दिल्ली कॅपिटल्स (पूर्वीची दिल्ली डेअरडेविल्स) मधून आयपीएलमध्ये पदार्पण केले. मुंबई इंडियन्स, डेक्कन चार्जर्स, सनरायझर्स हैदराबाद या संघांमधून तो खेळला आहे. -
दिनेश कार्तिक
आपला अखेरचा आयपीएल सीझन खेळत असलेल्या दिनेश कार्तिकने दिल्ली संघामधून आयपीएलमध्ये पदार्पण केले. तो मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज, केकेआर, गुजरात लायन्स आणि आरसीबीचा भाग राहिला आहे. -
मनीष पांडे
मनीष पांडेने २००८मध्ये मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. आयपीएलमध्ये शतक झळकावणारा तो पहिला भारतीय फलंदाज आहे. यंदा केकेआरकडून खेळणाऱ्या या खेळाडूने १७० सामन्यांच्या आयपीएल कारकिर्दीत ३८०८ धावा केल्या आहेत. -
रिध्दीमान साहा
गुजरात टायटन्सचा विकेटकीपर फलंदाज रिध्दीमान साहा २००८ पासून आयपीएल खेळत असून त्याने केकेआरकडून पदार्पण केले. चेन्नई आणि गुजरात संघात असताना त्याने आयपीएलचे जेतेपद मिळवले आहे.

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख