-
पदार्पण
१५ नोव्हेंबर १९८९ मध्ये १६ वर्षीय सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटध्ये पदार्पण केले. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये सचिनने पाऊल टाकले. (फोटो सौजन्य-एक्सप्रेस फोटो) -
सर्वाधिक शतके
सचिनच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक १०० शतके आहेत. यापैकी ४९ एकदिवसीय सामन्यात आणि ५१ शतके कसोटी सामन्यात झळकावली आहेत. (फोटो सौजन्य-एक्सप्रेस फोटो) -
सर्वाधिक सामने
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे, ज्यामध्ये त्याने सर्वाधिक धावाही केल्या आहेत. आजही सचिन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ३४,३५७ धावा करणारा खेळाडू आहे. (फोटो सौजन्य-पीटीआय) -
कसोटीमधील विक्रम
सचिन तेंडुलकर सर्वाधिक २०० कसोटी सामने भारतासाठी खेळले आहेत. जागतिक क्रिकेटमध्ये कोणत्याही खेळाडूने ही संख्या गाठलेली नाही. (फोटो सौजन्य-पीटीआय) -
वनडेमध्ये पहिले द्विशतक
वनडेमध्ये सर्वात मोठ्या धावसंख्येचा विक्रम रोहित शर्माच्या नावे असला तरी वनडेमध्ये पहिले द्विशतक झळकावण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. २०१० मध्ये ग्वाल्हेरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सचिनने ही कामगिरी केली होती. (फोटो सौजन्य-एक्सप्रेस फोटो) -
सर्वाधिक वनडे सामने
कसोटीप्रमाणेच सचिनच्या नावे सर्वाधिक वनडे सामन्याचा विक्रम आहे. सचिनने ४६३ वनडे सामने खेळले असून २०१२ मध्ये भारतासाठी अखेरचा वनडे सामना खेळला. त्यानंतर महेला जयवर्धनेने ४४८ वनडे सामने खेळले आहेत. (फोटो सौजन्य-पीटीआय) -
सर्वाधिक धावा
कसोटी क्रिकेटप्रमाणेच एकदिवसीय क्रिकेटमध्येही सचिन तेंडुलकरने सर्वाधिक धावा केल्या आहेत. मास्टर ब्लास्टरने ४४.८३ च्या सरासरीने १८ हजार ४२६ धावा करत आपली एकदिवसीय कारकीर्द पूर्ण केली. (फोटो सौजन्य-एक्सप्रेस फोटो)

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही