-
बीसीसीआयने १ जूनपासून सुरू होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघाच्या कर्णधारपदाची धुरा रोहित शर्मा याच्याकडे देण्यात आली आहे. ( फोटो सौजन्य – ऋषभ पंत इंस्टाग्राम खाते )
-
या संघात ऋषभ पंतचीही निवड करण्यात आली असून तो अपघातानंतर १६ महिन्यांनी भारतीय संघात पुनरागमन करणार आहे. विशेष म्हणजे इतक्या कमी वेळा ऋषभने ज्या पद्धतीने स्वत:ला तयार केलंय त्याची चर्चा सध्या क्रिकेट वर्तुळात सुरू आहे. ( फोटो सौजन्य – ऋषभ पंत इंस्टाग्राम खाते )
-
ऋषभ पंतची टी-२० विश्वचषकासाठी करण्यात आलेली निवड ही त्याच्या आयपीएलमधील सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर करण्यात आली असली, तरी भारतीय संघातील पुनरागमनासाठी ऋषभने बऱ्याच गोष्टींचा त्याग केला आहे. ( फोटो सौजन्य – ऋषभ पंत इंस्टाग्राम खाते )
-
तसं बघायला गेलं तर एका मोठ्या अपघातानंतर ऋषभसाठी भारतीय संघात पुनरागमन करणं म्हणावं तितकं सोपं नव्हतं. मात्र, त्याने आपली जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे साध्य करून दाखवलं. ( फोटो सौजन्य – ऋषभ पंत इंस्टाग्राम खाते )
-
त्यासाठी ऋषभने खडतर आव्हानांचा समाना केला. अगदी खाण्या-पिण्यापासून ते झोपण्याच्या वेळेपर्यंत त्याने स्वत:ला अनेक सवयी घालून घेतल्या. ( फोटो सौजन्य – ऋषभ पंत इंस्टाग्राम खाते )
-
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, ऋषभने गेल्या चार महिन्यांत एकूण १६ किलो वजन कमी केलं. तसेच मार्चच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे आयपीएल सुरू होण्यापूर्वीच त्याने तब्बल १३ किलो वजन कमी केल होतं.( फोटो सौजन्य – ऋषभ पंत इंस्टाग्राम खाते )
-
फिटनेसबरोबरच ऋषभने आपल्या आहारातही मोठा बदल केला. जास्त कॅलरीचे पदार्थ त्याने आपल्या आहारातून बाद केले. त्यासाठी त्याला त्याचे आवडीचे पदार्थ म्हणजे फ्राईड चिकन, रसमलाई आणि बिर्याणीचाही त्याग करावा लागला. ( फोटो सौजन्य – ऋषभ पंत इंस्टाग्राम खाते )
-
घरचे जेवण मिळावे यासाठी ऋषभने एनसीएमध्ये असताना हॉटेलऐवजी भाड्याच्या घरात राहणे पसंत केले. यादरम्यान त्याला केवळ ५ मिली जास्तीचे ऑलिव्ह ऑइल वापरण्याची परवानगी होती. त्यामुळे मर्यादित तेलातच त्याला आपले जेवण बनवावे लागायचे. ( फोटो सौजन्य – ऋषभ पंत इंस्टाग्राम खाते )
-
फिटनेस आणि खाण्याबरोबरच ऋषभने त्याच्या झोपण्याच्या वेळेतही बरेच बदल केले. आठ ते नऊ तासाची पुरेशी झोप मिळावी, यासाठी तो रात्री ११ नंतर आपला फोन आणि आयपॉड बंद करायचा. ( फोटो सौजन्य – ऋषभ पंत इंस्टाग्राम खाते )
-
पहाटे उठून तो व्यायाम आणि दोन अडीच तास क्रिकेटचा सराव करायचा, महत्त्वाचे म्हणजे त्याच्या या मेहनतीचे परिणाम आयपीएलमधील त्याच्या सातत्यपूर्ण प्रदर्शनात दिसून आले. ( फोटो सौजन्य – ऋषभ पंत इंस्टाग्राम खाते )
-
दरम्यान, ऋषभ पंत आता पुन्हा एकदा भारतीय संघाच्या जर्सीत खेळताना दिसणार आहे. त्याच्या चाहत्यांना आता पुनरागमनाची प्रतिक्षा आहे. ( फोटो सौजन्य – ऋषभ पंत इंस्टाग्राम खाते )
-
टी-२० विश्वचषक संघात निवड झाल्यानंतर ऋषभ पंतनेही प्रतिक्रिया दिली आहे. “मी भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये परतण्याची वाट बघतोय. त्यासाठी मी कोणतीही कसर सोडलेली नाही. विश्वचषकात माझ्या खेळाबाबत तक्रार करण्याची कोणतीही संधी मी क्रिकेट प्रेमींना देणार नाही”, असे तो म्हणाला. ( फोटो सौजन्य – ऋषभ पंत इंस्टाग्राम खाते )

त्या दोघींनी अक्षरश: मर्यादाच ओलांडली! रिक्षात लपून करत होत्या ‘असं’ काही की…, VIDEO पाहून धक्काच बसेल