-
त्याचबरोबर चार टी-२० सामन्यात ७ बळी घेतले आहेत. या प्रवासात नटराजनच्या यशात त्याची पत्नीची सर्वात मोठी साथ राहिली आहे.
-
टी नटराजनच्या पत्नीचे नाव पवित्रा नटराजन आहे. तिने तामिळनाडूतील चिन्नामपट्टी येथील सरकारी शाळा आणि कोंगू अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले आहे.
-
टी नटराजन आणि पवित्रा शाळेच्या दिवसांपासून एकमेकांना ओळखतात. नटराजनने स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते की, सुरुवातीला आम्ही मित्र होतो.
-
यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. अखेर त्यांनी जून २०१८ मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला.
-
या दोघांना एक मुलगी आहे. त्यांच्या मुलीचे नाव हनविका आहे, तिचा जन्म ६ नोव्हेंबर २०२० रोजी झाला होता.
-
टी नटराजन मानतो की त्याची पत्नी आणि मुलगी त्याच्यासाठी खूप भाग्यवान आहेत. हनविकाच्या जन्मानंतर नटराजनने भारतीय संघात पदार्पण केले होते.
-
पवित्रा इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय आहे आणि तिने शेअर केलेल्या फोटोंवरून असे दिसून येते की तिला प्रवास करायला आवडते. त्यांचे कुटुंबीय अनेक ठिकाणी गेले आहेत.
-
टी नटराजन भारताकडून खेळला असून आयपीएल २०२४ मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळत आहे. या प्रवासात पवित्राने त्याला नेहमीच साथ दिली आहे. (Photo Source – Pavitra Nantharajan )
