-
एसएस धोनी
आयपीएल २००८ च्या पहिल्याच हंगामापासून चेन्नई सुपर किंग्सचे कर्णधारपद एम एस धोनीकडे होते. त्याने पहिल्याच हंगामात त्याच्या नेतृत्त्वाखालील संघाला प्लेऑफमध्ये नेले होते.
-
वीरेंद्र सेहवाग
आयपीएल २००८ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार असलेल्या सेहवाहगने संघाला पहिल्याच वर्षी प्लेऑफमध्ये नेले होते. -
युवराज सिंग
धोनी आणि सेहवागप्रमाणे पहिल्याच वर्षी कर्णधार युवराज सिंगच्या नेतृत्त्वाखालील पंजाब किंग्सचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला होता. -
अनिल कुंबळे
आयपीएल २००९ मध्ये अनिल कुंबळेच्या नेतृत्त्वाखालील आरसीबीचा संघाला प्लेऑफ गाठण्यात यश मिळाले होते. -
हरभजन सिंग
हरभजन सिंगने २०१२च्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघआचे नेतृत्त्व केले होते. त्याच्या कर्णधारपदाच्या पदार्पणातच त्याने मुंबईला प्लेऑफमध्ये नेले. -
रोहित शर्मा
मुंबई इंडियन्सचा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या रोहित शर्माने कर्णधार म्हणून पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात संघाला प्लेऑफ गाठून दिले आणि पहिले वहिले आयपीएलचे जेतेपदही मुंबईला मिळवून दिले. -
सुरेश रैना
२०१६ मध्ये सुरेश रैनाने गुजरात लायन्स संघाचे कर्णधारपद भूषवले होते आणि कर्णधार म्हणून पहिल्याच हंगामात त्याने लायन्सला प्लेऑफमध्ये नेले. -
अजिंक्य रहाणे
२०१८ मध्ये राजस्थान रॉयल्सच्या नेतृत्त्वाची जबाबदारी नवा कर्णधार अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर होती, ज्याने संघाला प्लेऑफपर्यंत नेले. -
दिनेश कार्तिक
२०१८ मध्ये दिनेश कार्तिकने केकेआर संघाचे कर्णधारपद भूषवले होते आणि कर्णधारपद म्हणून पदार्पणाच्या सामन्यात केकेआरला प्लेऑफमध्ये नेले. -
श्रेयस अय्यर
२०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्त्व श्रेयस अय्यरकडे होते. दिल्लीसाठी पहिल्यांदाच कर्णधारपद भूषवत असलेल्या श्रेयसने संघाला प्लेऑफचा रस्ता गाठून दिला होता. -
ऋषभ पंत
२०२१ मध्ये दिल्लीने ऋषभ पंतच्या खांद्यावर दिल्लीने कर्णधारपदाची जबाबदारी दिली, ज्याने पहिल्याच हंगामात दिल्लीला प्लेऑफ गाठून दिले होते. -
हार्दिक पंड्या
२०२२ मध्ये गुजरात टायटन्स संघाने पंड्याला आपल्या संघाचा कर्णधार बनवले आणि पहिल्याच वर्षात त्याने गुजरातला प्लेऑफसह ट्रॉफीही जिंकून दिली.