-
सुनील छेत्री
भारताच्या फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री जूनमधील अखेरचा सामना खेळत निवृत्ती घेणार आहे. -
लव्हस्टोरी
सुनील लव्हस्टोरी खूपच फिल्मी असून तो मोहन बागान क्लबच्या प्रशिक्षकाच्या मुलीच्या प्रेमात पडला. -
कोचची मुलगी
सोनम ही सुनील छेत्रीचे फुटबॉल कोच सुब्रतो भट्टाचार्य यांची मुलगी आहे. -
लव्हस्टोरी
सुनील हा भट्टाचार्य यांच्या कोचिंग अंडर मोहन बागानमध्ये खेळत होता. तेव्हा तो १८ वर्षांचा होता तर सोनम १५ वर्षांची होती. -
तिने केला मेसेज
तेव्हा सोनमने तिच्या वडिलांच्या मोबाईलमधून सुनीलचा नंबर घेतला आणि त्याला मेसेज केला की मी तुझी खूप मोठी फॅन आहे आणि मला तुला भेटायचं आहे. -
भेट
सुनीलला तेव्हा माहित नव्हतं की सोनम त्याच्या कोचची मुलगी आहे. त्यानंतर दोघांची भेट झाली आणि तेव्हा सोनम खूप लहान मुलगी दिसत होतीस तेव्हा अभ्यास पूर्ण कर असं सुनीलने तिला सांगितलं. -
मेसेज
पण भेटीनंतर या दोघांचं मेसेजवर बोलणं सुरू होतं. एक दिवस सुनीलला जेव्हा कळलं की सोनम कोचची मुलगी आहे, तेव्हा तो प्रचंड भडकला. -
बोलणं बंद
सोनम कोचची मुलगी आहे कळल्यानंतर तो म्हणाला, कोचला जर का ही गोष्ट कळली तर माझं करियर संपेल. यानंतर त्याने तिच्याशी २ महिने बोलणं बंद केलं. -
सुनीलने केला मेसेज
सोनमसोबत बोलणं बंद केल्यानंतरही तो तिला स्वत:च्या मनात काढू शकला नाही आणि त्याने तिला मेसेज केला. मग पुन्हा दोघांमध्ये बोलणं सुरू झालं. -
प्रेमात
सोनम आणि सुनीलची एकमेकांच्या प्रेमात पडले. बरेच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर ४ डिसेंबर २०१७ रोजी कोलकातामध्ये दोघांचा लग्नसोहळा पार पडला. (सर्व फोटो-सुनील छेत्री इन्स्टाग्राम)
डोकं एकीकडे, हाता-पायांचा चेंदामेंदा; मुंबईत लोअर परेलच्या ब्रीजवर भीषण अपघात; टॅक्सीचा चक्काचूर, थरकाप उडवणारा VIDEO