-
भारतीय स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने २०२१ मध्ये वयाच्या ३१ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणापूर्वी त्याने आयपीएलमध्ये खूप धुमाकूळ घातला होता. तो आयपीएलमध्ये सध्या मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व करतो.
-
आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या काही वर्षांपूर्वी सूर्याने देविशा शेट्टीशी लग्न केले. पत्नी देविशाने सूर्याला त्याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणात खूप मदत केली. पण हे दोघे पहिल्यांदा कसे भेटले आणि त्यांची लव्हस्टोरी कुठून सुरू झाली हे तुम्हाला माहिती आहे का, चला जाणून घेऊया.
-
‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स’ या यूट्यूब शोमध्ये सूर्याने आपल्या लव्हस्टोरीबद्दल सांगितले होते. तो म्हणाला, “मी कॉलेजमध्ये दुसऱ्या मुलासोबत बसलो होतो आणि मी दुसरीकडे बघत होतो. ती माझ्या मागून येत होती. माझ्या मित्राने हाक मारली आणि आम्ही मागे वळून पाहिले. “माझ्या मित्राने मला आणि बाजूला असलेल्या एका व्यक्तीला हाय केले.”
-
सूर्या पुढे म्हणाला, “मी माझ्या मित्राला विचारले, ती तुझी मैत्रीण आहे का? ओळख करुन देना. हाय-हॅलो, बाकीचे नंतर बघू. मी जाऊन बोललो. ५ मिनिटात संवाद संपला आणि ती निघून गेली. माझ्या मित्राने मला सांगितले की काहीही तुझ्या नियंत्रणात नाही. त्यावेळी बीबीएम खूप लोकप्रिय होते.
-
सूर्या म्हणाला, “मी माझ्या मित्राला बीबीएमचा पिन घेण्यास सांगितले, जेणेकरून प्रकरण पुढे जाऊ शकेल. माझा मित्र म्हणाला मी प्रयत्न करतो. यानंतर दुसऱ्या दिवसापासून मी बीबीएमवर रिक्वेस्ट पाठवत राहिलो, तिकडून रद्द होत राहिल्या. त्यानंतर मी फेसबुकवर रिक्वेस्ट पाठवली, त्यानंतर ती स्वीकारण्यात आली.
-
स्काय पुढे म्हणाला, “संधी तरी आहे बॉस. मग तिने विचारले तू काय करते? मी माझी छाती फुगवली आणि सांगितले की मी मुंबई इंडियन्ससाठी क्रिकेट खेळतो.”
-
सूर्या पुढे म्हणाला, “मला वाटले की हा एक चांगला दृष्टीकोन असेल, परंतु तिच्याकडून प्रतिसाद सामान्य होता. यानंतर आम्ही भेटून बोलायला सुरुवात केली. सुरुवातीला खूप भांडण व्हायचे, पण हळूहळू आम्ही गंभीर होत गेलो.” (Photo Source – Devisha Shetty Insta)

नवरदेव पाहताच नवरी भारावली! पाहुण्यांसमोरच केला भन्नाट डान्स; नवरदेवही लाजला…हौशी नवरीचा VIDEO एकदा पाहाच