-
भारतीय फुटबॉलपटू सुनील छेत्रीने आपल्या २० वर्षांच्या उल्लेखनीय कारकिर्दीनंतर फुटबॉलमधून आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे.
-
सुनील छेत्री आंतराष्ट्रीय फुटबॉलमधील आपला शेवटचा सामना ६ जून रोजी कोलकाता इथे कुवेत विरुद्ध फिफा विश्वचषक सामन्यादरम्यान खेळणार आहे.
-
सुनील छेत्रीचे फुटबॉलमधील प्रवास लाखो लोकांसाठी प्रेरणादायी आहे.
-
या भारतीय फुटबॉलपटूने २००५ मध्ये भारतीय फुटबॉल संघामध्ये पदार्पण केल्यापासून, तो देशासाठी सर्वाधिक सामने खेळणार आणि सर्वाधिक गोल करणार खेळाडू बनला आहे.
-
१९ जून २००५ मध्ये भारतीय फुटबॉल संघ तीन सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तानला गेला होता तेव्हा या २० वर्षीय फुटबॉलपटूने संघात आपल्या पदार्पणासह सामन्यात भारतीय संघासाठी एक गोलही केला होता.
-
सुनील छेत्रीने भारतासाठी एकूण १५० सामने खेळले आहेत आणि यासह त्याने ९३ गोल केले आहेत. २०२२ मधील आंतरराष्ट्रीय फिफा विश्वचषक स्पर्धेत नेपाळविरुद्धच्या सामन्यात ९० गोलांचा टप्पा ओलंडणारा सुनील छेत्री हा पहिला भारतीय फुटबॉलपटू बनला होता.
-
आपल्या कारकिर्दीत सुनील छेत्रीने आंतरराष्ट्रीय एएफसी चॅलेंज कप, सएफफ चॅम्पियनशिप, नेहरू चषक आणि इंटरकॉन्टिनेन्टल स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे आणि शानदार विजेतेपदांसह अनेक विक्रम केले आहेत.
-
भारताचा सर्वात यशस्वी फुटबॉलपटू म्हणून ओळखला जाणारा सुनील छेत्री त्याच्या उल्लेखनीय कामगिरीसह जागतिक स्तरावरही सर्वोच्च तीन आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादी सामील आहे.
-
भारतीय कर्णधार सुनील छेत्री १५० सामन्यांमध्ये ९४ गोलांसह, अर्जेंटिना स्टार लिओनेल मेस्सी आणि पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोसह सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोलांच्या यादीत तिसरे स्थान राखून आहे.
-
२००८ एएफसी चॅलेंज कपमध्ये सुनील छेत्रीने चार महत्त्वपूर्ण गोल करून आपल्या अप्रतिम कामगिरीने भारताला ताजिकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात विजय मिळवून दिली होती. या सामन्यामध्ये सुनीलने आपली विशेष हॅटट्रिकही पूर्ण केली होती.
-
मैदानावरील सुनील छेत्रीच्या उत्तम कामगिरीसाठी फीफने २०२२ मध्ये “कॅप्टन फॅन्टास्टिक” नावाची डॉक्यूमेंट्री देखील प्रदर्शित केली होती, या डॉक्युमेंटरीमध्ये त्याच्या उल्लेखनीय गोल-स्कोअरिंग पराक्रमाची प्रशंसा केली आहे.
-
(सर्व फोटो : सुनील छेत्री / इन्स्टाग्राम)
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार नुसता पैसा; सूर्याचे नक्षत्र परिवर्तन देणार प्रसिद्धी, प्रेम अन् पैसा