-
मुंबई इंडियन्स संघाचा आयपीएल २०२४ मधील पराभव झाल्यानंतर आता पुन्हा एकदा रोहित शर्मा संघ सोडणार का? या चर्चंना उधाण आले आहे.
-
अनेक चाहते देखील रोहित शर्माला हाच प्रश्न विचारत आहेत. यामागचे कारणही तसेच आहे, कारण नुकतेच रोहित शर्माने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केलेत.
-
मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल २०२४ पूर्वी हिटमॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहितला कर्णधारपदावरुन काढून टाकले. त्याच्या जागी ऑलराउंडर हार्दिक पंड्याकडे कमान सोपवण्यात आली,
-
मात्र हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबई टीमची कामगिरी फारच निराशाजनक होती. १४ पैकी केवळ ४ सामने जिंकून हा संघ शेवट्या स्थानी राहिला. याच मुंबईने रोहित शर्मच्या नेतृत्वाखाली ५ आयपीएल ट्रॉफी जिंकल्या होत्या.
-
यात रोहितने रविवारी मुंबई इंडियन्स संघातील ६ फोटो पोस्ट केलेत. ज्याच्या कॅप्शनमध्ये काहीही लिहिले नाही, फक्त एक हार्ट इमोजी टाकला आहे.
-
रोहितच्या या पोस्टमुळे तो खरचं मुंबई इंडियन्स संघ सोडतोय की काय या चर्चांना जोर आला आहे.
-
अनेकांनी या फोटोवरुन रोहितला कमेंट सेक्शनमध्येही हा प्रश्न विचारला आहे. यावर एका युजरने लिहिले की, रोहित मुंबई इंडियन्स सोडत असल्याचे हे संकेत आहेत.
-
दुसऱ्या एका युजरने लिहिले की, रोहितचा निळ्या जर्सीतील हा शेवटचा सीझन नसेल अशी आशा आहे.
-
दरम्यान अनेकांनी हिटमॅन आम्ही नेहमी तुझ्याबरोबर आहोत असे म्हणत रोहित शर्माला पाठिंबा दिला आहे. (photo Credit -@rohitsharma45/ insta)

नवरदेव पाहताच नवरी भारावली! पाहुण्यांसमोरच केला भन्नाट डान्स; नवरदेवही लाजला…हौशी नवरीचा VIDEO एकदा पाहाच