-
सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन यंदाच्या IPL मध्ये एक मॅच खेळूनही चर्चेत राहिला २.२ षटकात एका जवळपास मिळालेली विकेट आणि खूप ड्रामा घेऊन अर्जुन MI च्या शेवटच्या सामन्यातुन बाहेर पडला होता
-
सचिन तेंडुलकरच्या एकदम विरुद्ध वागणूक असलेल्या अर्जुन तेंडुलकरचा मैदानातील आक्रमकपणा पाहून काहींनी त्याला ट्रोल तर काहींनी कौतुक केलं होतं
-
२०२३ पासून MI च्या चमूत असलेल्या अर्जुनचं मैदानात उतरण्याआधीचं आयुष्य कसं होतं, हे पाहूया..
-
सचिन तेंडुलकरच्या लेकाने म्हणजेच अर्जुनने मुंबई विद्यापीठातून पदवी देखील घेतली आहे. त्याआधी अर्जुन तेंडुलकरने मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शालेय शिक्षण घेतले.
-
शिक्षण सांभाळून अर्जुन अतुल गायकवाड व माजी वेगवान गोलंदाज सुब्रतो बॅनर्जी यांच्याकडून क्रिकेटचे डावपेच शिकला आहे
-
२०१८ मध्ये अंडर १९ क्रिकेटमध्ये श्रीलंकेच्या विरुद्ध पदार्पण केले होते. मात्र त्याच्या वयामुळे त्याची विश्वचषकासाठी निवड झाली नव्हती.
-
जानेवारी २०२१ मध्ये त्याने सय्यद मुश्तक अली चषकासाठी टी २० मध्ये पदार्पण केले. तेव्हा हरियाणाकडून खेळताना त्याने ३४ धावा देत १ विकेट घेतली होती.
-
एप्रिल २०२३ मध्ये त्याने KKR विरुद्ध IPL मध्ये पदार्पण केले व १७ धावा देत १ विकेट घेतली होती
-
तुम्हाला माहित आहे का, २०२२ मध्ये जेव्हा अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सकडून संघात निवडण्यात आलं तेव्हा तब्बल ३० लाख रुपयात त्याला आयपीएल लिलावात खरेदी करण्यात आलं होतं. त्यावेळी अर्जुन अवघा २३ वर्षांचा होता.(सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम/ @ArjuTendulkar/ इन्स्टाग्राम)

Happy Women’s Day 2025 : महिलांना द्या जागतिक महिला दिनाच्या हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश