-
अफेयरच्या चर्चा
स्मृती मानधना आणि गायक पलाश मुच्छल या दोघांच्याही अफेयरच्या चर्चा सुरूच आहेत. पण दोघांपैकी कोणीही यावर वक्तव्य केलेले नाही. -
वाढदिवस
यादरम्यानच पलाश मुच्छलच्या वाढदिवसाला स्मृती मानधनाने खास फोटो पोस्ट करत छानसं कॅप्शन दिलं आहे. -
पोस्ट
स्मृतीने याआधीही पलाशला फोटो पोस्ट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण यावेळेस तिने शेअर केलेले फोटो खूपच खास आहेत. यावरून पुन्हा एकदा यांच्या अफेयरच्या चर्चांना सुरूवात झाली. -
कॅप्शन
स्मृतीने दोन फोटो शेअर केले असून खाली कॅप्शन दिले आहे. त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत कायम सोबत असल्याबद्दल त्याचे आभार मानले आहेत. -
इन्स्टाग्राम स्टोरी
स्मृती इन्स्टाला स्टोरी पोस्ट करत त्यामध्ये तिने कॅप्शन दिले आहे की ‘माझ्या सर्वात मोठ्या चाहत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा.’ -
टॅटू
पलाशच्या हातावर एक टॅटू काढलेला आहे, या टॅटूमध्ये SM18 असे लिहिले आहे. या टॅटूला चाहत्यांनी स्मृती मानधनाच्या जर्सी नंबरसोबत जोडले होते आणि हा टॅटू खास तिच्यासाठीच असल्याचेही म्हटले. -
एकत्र
स्मृती आणि पलाश अनेकदा एकमेकांसोबत फोटो स्टोरी शेअर करत असतात. पलाश स्मृतीच्या सामन्यांना तर स्मृती पलाशच्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावते. -
सर्व फोटो सौजन्य- स्मृती मानधना आणि पलक मुच्छल इन्स्टाग्राम

Hanuman Jayanti 2025 Wishes: हनुमान जयंतीला प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा ‘या’ खास मराठमोळ्या शुभेच्छा; पोस्ट करा सुंदर PHOTOS