-
सनरायजर्स हैदराबादच्या संघाने यंदाच्या आयपीएलमधील शक्तिशाली संघांपैकी एक अशा राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय मिळवून २०१८ नंतर पहिल्यांदाच आयपीएलच्या अंतिम सामन्यात धडक दिली आहे
-
राजस्थान रॉयल्सचे यंदाचे आव्हान संपुष्टात आले असले तरी संपूर्ण आयपीएलच्या हंगामात आर आरने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत अनेक क्रिकेट प्रेमींची मने जिंकली होती. या यशाचा शिल्पकार म्हणून कर्णधार संजू सॅमसनला सुद्धा बरीच प्रसिद्धी मिळाली आहे.
-
संजू सॅमसन हा यंदा आयपीएलनंतर टी २० विश्वचषकात सुद्धा खेळणार आहे. प्रचंड चर्चेत आलेल्या संजूच्या मैदानाबाहेरील आयुष्याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत.
-
मीडिया रिपोर्टनुसार संजू सॅमसनची नेटवर्थ ही १० मिलियन डॉलर म्हणजे साधारण ८३ कोटींच्या घरात आहे. क्रिकेटव्यतिरिक्त जाहिरातींमधून सुद्धा संजू दणदणीत कमाई करतो.
-
संजूच्या नावे स्वतःचे घर व काही आलिशान गाड्या असून काही शहरांमध्ये त्याने प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक सुद्धा केली आहे.
-
संजू सॅमसनहा बीसीसीआयच्या करारानुसार सी ग्रेडमधील खेळाडू आहे. त्याला दरवर्षी बीसीसीआयकडून १ कोटी रुपयांचे मानधन मिळते. जेव्हा तो टीम इंडियाकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत नाही तेव्हा डोमेस्टिक क्रिकेटमधूनही उत्तम कामे करतो
-
सॅमसनच्या आर्थिक कमाईचा मोठा हिस्सा हा आयपीएलमधील मानधनाचा आहे. सॅमसनला एका सीझनसाठी अंदाजे १४ कोटी मानधन मिळते. पहिल्या वर्षी केकेआरकडून खेळताना त्याला ८ लाख रुपये प्राप्त झाले होते तर २०१२ पासून ते २०२४ पर्यंत त्याने ९० कोटींपर्यंत कमाई केली आहे
-
संजू सॅमसनने केरळमध्ये विजहिनजम येथे आपल्या कुटुंबासाठी आलिशान घर उभारले होते ज्याची किंमत कोट्यवधी रुपये असल्याचे समजतेय. तर मीडिया रिपोर्ट्स नुसार सॅमसनने मुंबई, बंगळुरू व हैदराबादमध्ये सुद्धा प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केली आहे
-
संजूच्या आलिशान गाड्यांच्या यादीत ६६ लाख रुपयांची ऑडी A6 व ६५ लाखांची बीएमडब्ल्यू ५, ६० लाखांची मर्सिडीज बेंझ सी क्लास व १.६४ कोटींची रेंज रोव्हर सुद्धा आहे.(फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम/इन्स्टाग्राम @sanjusamson)

बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल