-
आयपीएल २०२४ विजेता
कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने सनरायझर्स हैदराबादचा पराभव करत आयपीएल २०२४ चे जेतेपद पटकावले. (फोटो-आयपीएल) -
आयपीएल २०२४ उपविजेता
सनरायझर्स हैदराबाद संघाला अंतिम सामन्यात केकेआरविरूद्ध पराभवाचा सामना करावा लागला. हा संघ यंदाच्या हंगामातील उपविजेता संघ ठरला.(फोटो-आयपीएल) -
ऑरेंज कॅप
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा विस्फोटक फलंदाज विराट कोहलीने यंदाच्या हंगामात सर्वाधिक ७४१ धावा करत ऑरेंज कॅप पटकावली आहे. (फोटो-आयपीएल) -
परपल कॅप
पंजाब किंग्सचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने आपल्या भेदक गोलंदाजीसह सर्वाधिक २४ विकेट्स घेतल्या आणि परपल कॅपचा मानकरी ठरला. (फोटो-आयपीएल) -
इमर्जिंग प्लेअर
सनरायझर्स हैदराबादचा नवा खेळाडू नितीश कुमार रेड्डीला यंदाच्या हंगामातील इमर्जिंग प्लेअरचा पुरस्कार मिळाला. (फोटो-आयपीएल) -
फेयरप्ले अवॉर्ड
सनरायझर्स हैदराबाद संघाला आयपीएल २०२४ मधील फेयरप्ले अवॉर्डचा पुरस्कार मिळाला आहे. हैदराबादच्या नावे १७ सामन्यांमध्ये एकूण १७३ गुण मिळाले आहेत. (फोटो-X सोशल मीडिया) -
मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर
कोलकाता संघाचा उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू सुनील नरेन याला यंदाचा मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयरचा पुरस्कार मिळाला. त्याने यंदाच्या हंगामात ४८८ धावा आणि १७ विकेट्स घेत शानदार कमिगिरी केली आहे. (फोटो-आयपीएल) -
कॅच ऑफ द सीझन
रमणदीप सिंगला यंदाच्या हंगामातील सर्वाेत्कृष्ट कॅचचा मानकरी रमणदीप सिंग ठरला. ५ मे रोजी झालेल्या लखनऊ सुपर जायंट्सविरूद्धच्या सामन्यात मागे धावत जाऊन रमणदीपने कमाल झेल टिपला होता. (फोटो-केकेआर)
भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”