-
आयपीएल २०२४चे पर्व अनेक कारणांनी खास ठरले. ट्रॉफी जिंकता आली नसली तरीही अनेक खेळाडूंनी आपल्या कामगिरीने क्रिकेटप्रेमींची मने जिंकली. नव्या तसेच अनुभवी खेळाडूंचाही या यादीत समावेश आहे. (IPL/Instagram)
-
विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह या अनुभवी खेळाडूंनी त्यांच्या अप्रतिम कामगिरीने सर्वांनाच थक्क केले. त्याच वेळी, काही कमी लोकप्रिय असणाऱ्या खेळाडूंनीही अनेक विक्रम केले. (IPL/Instagram)
-
आज आपण आयपीएल २०२४ च्या अशा काही खेळाडूंबद्दल जाणून घेऊया जे भविष्यात मोठे स्टार्स झालेले पाहायला मिळू शकतात. (IPL/Instagram)
-
नितीश कुमार रेड्डी यंदा सनरायझर्स हैदराबादचा अष्टपैलू खेळाडू ठरला. २१ वर्षीय नितीशने ३३.६७ च्या सरासरीने संघासाठी ३०३ धावा केल्या. १४२.९२ च्या स्ट्राइक रेटसह रेड्डीने सनरायझर्सची मधली फळी कायम राखली. त्याने दोन विकेटही घेतल्या होत्या. (IPL/Instagram)
-
ऑस्ट्रेलियाच्या जेक फ्रेझर मॅकगर्कला रिकी पाँटिंग आणि सौरव गांगुली यांनी दिल्ली कॅपिटल्समध्ये भरपूर पाठिंबा दिला. मॅकगर्कने यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली सुरुवात केली होती. गोलंदाज लुंगी एनगिडीच्या जागी 22 वर्षीय जेक फ्रेझर मॅकगर्कचा संघात समावेश करण्यात आला होता. (Instagram)
-
आयपीएल 2024 मध्ये दिल्लीचा सलामीचा फलंदाज मॅकगर्कने नऊ सामन्यांत ३३० धावा केल्या. त्याचा स्फोटक स्ट्राइक रेट २३४ पेक्षा जास्त होता. मॅकगर्कचा ऑस्ट्रेलियाने टी-२० विश्वचषकासाठी राखीव यादीत समावेश केला आहे. (Instagram)
-
यंदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीला विल जॅकची चांगली साथ मिळाली. जॅकने आपल्या आक्रमक फलंदाजीने प्रेक्षकांची मने जिंकली. (Instagram)
-
गुजरातविरुद्ध त्याने ४१ चेंडूत १०० धावा केल्या होत्या. २५ वर्षीय विल जॅकला यंदा आठ सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. यामध्ये त्याने २३० धावा केल्या. आरसीबीने त्याला लिलावात ३.२ कोटी रुपयांना विकत घेतले होते. (Instagram)
-
यंदा अभिषेक शर्माने पॉवरप्लेमध्ये गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. टी-20 विश्वचषकानंतर टीम इंडियामध्ये सहभागी होणाऱ्या नव्या खेळाडूंमध्ये अभिषेकचे नाव सर्वांत वर असेल. (Instagram)
-
अभिषेकने १६ सामन्यात ४८४ धावा केल्या. त्याने आयपीएल २०२४ मध्ये २०० च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली. संघाचा कर्णधार पॅट कमिन्सनेही त्याचे कौतुक करत म्हटले की “मला अभिषेकविरुद्ध गोलंदाजी करायला आवडणार नाही. तो एक जबरदस्त फलंदाज आहे.” (Instagram)
-
यंदाच्या आयपीएलमध्ये मयंक यादवच्या तुफान गोलंदाजीने फलंदाजांना धडकी भरवली. ताशी १५६.७ किमी वेगाने गोलंदाजी करत त्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. (Instagram)
-
लखनौ सुपर जायंट्सच्या या वेगवान गोलंदाजाने आयपीएल २०२४ मधील सर्वात वेगवान चेंडू टाकला. मयंकला या मोसमात केवळ चार सामने खेळता आले असले तरी त्याच्या वेगवान गोलंदाजीने बीसीसीआयचे लक्ष वेधून घेतलं आहे. (Instagram)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल