-
२०१० च्या आशिया चषकादरम्यान, पाकिस्तानी यष्टीरक्षक कामरान अकमल गौतम गंभीरला तो फलंदाजी करत असताना त्याच्याविरुद्ध अनावश्यक अपील करून त्रास देत होता. त्यानंतर गंभीर आणि अकमल यांच्यात जोरदार वादावादी झाली. अखेर हा वाद शांत करण्यासाठी धोनीला हस्तक्षेप करावा लागला होता.
-
२००३ मध्ये झालेल्या एका सामन्यात शोएब अख्तर वीरेंद्र सेहवागला एकामागून एक बाउन्सर फेकत होता, जेणेकरून तो शॉट खेळून आऊट होऊ शकेल. शोएबच्या कृत्याने हताश झालेला सेहवाग अख्तरकडे गेला आणि म्हणाला, “हिंमत असेल तर सचिनला स्ट्रायकवर आल्यावर बाउन्सर मार.” यानंतर सचिनने शोएबच्या बाऊन्सरवर षटकार मारला तेव्हा सेहवाग म्हणाला होत, ‘बाप बाप होता है, और बेटा बेटा होता है.’
-
२०१० च्या आशिया चषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताला शेवटच्या ७ चेंडूत ७ धावा करायच्या होत्या. अशा स्थितीत शोएब अख्तरने हरभजन सिंगला त्रास देणारा चेंडू टाकल्यानंतर त्याला चिथावणी दिली. यानंतर दोघांमध्ये मैदानावर जोरदार वाद सुरू झाला. यानंतर हरभजन सिंगने आमिरच्या चेंडूवर षटकार ठोकत भारताला विजय मिळवून दिला. विजय मिळवून दिल्यानंतर हरभजन सिंगनेही आपली आक्रमक वृत्ती शोएब अख्तरला दाखवली.
-
वर्ष २००७ मध्ये, जेव्हा पाकिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर आला होता, तेव्हा कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर ५ वनडे मालिकेतील तिसरा सामना खेळला गेला होता. ज्यामध्ये गौतम गंभीर आणि शाहिद आफ्रिदी यांच्यात कडाक्याचे भांडण झाले होते. कारण शाहिदच्या चेंडूवर गंभीर एकेरी धाव घेत असताना दोघांची टक्कर झाली आणि आफ्रिदीने हे जाणूनबुजून केले होते, ज्यामुळे दोघांमध्ये वाद सुरू झाला होता.
-
बर्मिंगहॅममध्ये २००४ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान, राहुल द्रविडचा पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरशी वाद झाला होता. राहुल द्रविडने शोएब अख्तरचा चेंडू फटकावल्यानंतर द्रविड दोन धावा अधिक वेगाने घेण्यासाठी धावला, पण दरम्यान अख्तर मुद्धाममध्ये उभारला होता. ज्यामुळे
-
चेंडूकडे पाहत धावत असलेला द्रविड शोएबला धडकला. यामुळे संतापलेल्या राहुल द्रविडने अख्तरला सुनावलं. दरम्यान, शोएबला संतापला आणि तो द्रविडला काहीतरी बोलला. ज्यामुळे राहुल द्रविड शोएबकडे रागाने गेला. यानंतर पाकिस्तानचा कर्णधार इंझमाम उल हकने जेव्हा वाद वाढत असल्याचे पाहिले, तेव्हा त्याने पंचासह दोघांना वेगळे केले. तसेच कामरान अकमल आणि इशांत शर्मा यांच्यातही वाद झाला होता.
-
१९९२ च्या विश्वचषकात जावेद मियांदाद भारताविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करत होता. भारताने पाकिस्तानला २१७ धावांचे लक्ष्य दिले होते आणि प्रत्युत्तरात पाकिस्तानने दोन विकेट गमावल्या. सचिन तेंडुलकरच्या हातात चेंडू होता आणि भारतीय यष्टीरक्षक किरण मोरे वारंवार अपील करत होते, ज्यामुळे मियांदाद संतप्त झाला होता. यामुळे दोघांत वाद झाला आणि मियांदादने अंपायरकडे जाऊन तक्रारही केली. पुढच्या चेंडूवर मियांदाद दोन धावा पूर्ण करत असताना किरण मोरेने त्याच्याविरुद्ध धावबादची अपील केली. यामुळे जावेद इतका चिडला की त्याने खेळपट्टीवर उड्या मारायला सुरुवात केली. (Photo Source – File Photos Jansatta)

सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या भोसलेला अखेर अटक; उत्तर प्रेदशातून घेतलं ताब्यात