
न्यूझीलंड संघाने अनुभवी गोलंदाज टीम साऊदीला टी-२० विश्वचषक २०२४ संघात संधी दिली आहे. ज्याचं वय ३५ वर्षे आणि १४० दिवस आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या इमाद वसीमची यंदाच्या टी-२० विश्वचषकात निवड करण्यात आली आहे. त्याचं वय ३५ वर्षे आणि १५८ दिवस आहे.
दोन वेळा टी-२० चॅम्पियन असलेल्या संघात मॅथ्यू वेड हा वयस्कर खेळाडू आहे, ज्याचं वय ३६ वर्षे आणि १२७ दिवस आहे.
इंग्लंड संघातील अनुभवी अष्टपैलू खेळाडू मोईन अली देखील टी-२० वर्ल्डकप संघाचा भाग आहे, ज्याचं वय ३६ वर्षे आणि ३१७ दिवस आहे.
श्रीलंकेच्या ताफ्यातील अनुभवी खेळाडू आणि टाईमआऊट होणारा क्रिकेटच्या इतिहासातील पहिला खेळाडू अँजेलो मॅथ्यूजही वयस्कर खेळाडूंच्या यादीत आहे, ज्याचं वय ३६ वर्षे आणि ३४२ दिवस आहे.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मासुद्धा वयस्कर खेळाडूंच्या यादीत आहे. जो चौथ्या क्रमांकाचा सर्वात वयस्कर खेळाडू आहे, त्याच वय ३७ वर्षे आणि ३४ दिवस आहे.
बांगलादेशच्या संघात महमुदुल्लाह या सर्वात वयस्कर खेळाडूला संधी दिली आहे. ज्याचं नाव ३८ वर्षे आणि १०० दिवस आहे.
अफगाणिस्तानच्या संघातील सर्वात अनुभवी आणि अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबी हा वयस्कर खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ज्याचं वय ३९ वर्षे आणि १२१ दिवस आहे.
टी-२० विश्वचषक २०२४ मधील सर्वात वयस्कर खेळाडूचे वय हे ४३ वर्षे
२५४ दिवस आहे, जो युगांडा संधाचा खेळाडू असून त्याच नाव फ्रँक नसुबुगा आहे.