-
भारतीय फुटबॉलपटू सुनील छेत्रीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून आपल्या निवृत्तीचा निर्णय सोशल मीडियाद्वारे चाहत्यांन सांगितला होता. गुरुवारी कुवेतविरुद्ध झालेल्या ‘फिफा’ विश्वचषक पात्रता सामना हा सुनील छेत्रीचा अंतिम आंतरराष्ट्रीय सामना होता. या सामन्यात भारताला गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले.
-
सुनील छेत्रीला निरोप देण्यासाठी हजारो चाहते स्टेडियममध्ये उपस्थित होते. सामना पाहण्यासाठी त्याचे कुटुंबीय, अधिकारी आणि माजी खेळाडूही उपस्थित होते.
-
या अंतिम सामन्यात सुनील छेत्रीला सपोर्ट करण्यासाठी चाहत्यांनी स्टेडियममध्ये वेगवेगळे पोस्टर्स आणले होते.
-
भारत-कुवेत सामन्यादरम्यान चाहत्यांनी सुनीलसाठी एक मोठा बॅनरदेखील बनवला होता.
-
चाहत्यांच प्रेम आणि कौतुक पाहून सुनील छेत्री भावुक झाला होता.
-
भारतीय संघाकडून छेत्रीला ‘गार्ड ऑफ ऑनर’देण्यात आला. त्यावेळी छेत्रीचे डोळे पाणावलेले होते. तसेच मैदानाबाहेर पडतानाही तो खूप भावूक झाला होता.
-
भारतविरुद्ध कुवेत फिफा विश्वचषक पात्रता सामना बरोबरीवर संपल्यामुळे सुनील निराश झाला होता.
-
कोलकाता येथे कुवेतविरुद्धचा सामना ०-० असा बरोबरीत संपला.
-
भारत आपला अखेरचा सामना ११ जूनला आशियाई विजेत्या कतारविरुद्ध खेळणार आहे.
-
(फोटो : पार्थ पॉल/एक्स्प्रेस)
वासनेसाठी पवित्र नात्याचा विसर, भरोसा सेलमध्ये सुटला नाजूक गुंता