-
भारत विरुद्ध पाकिस्तान टी-२० विश्वचषक सामना पाहण्यासाठी सारा तेंडुलकर,सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर अमेरिकेत गेले होते. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये तेंडुलकर परिवार भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देताना दिसले होते.
-
अलीकडेच साराने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती लहान मुलांना शिकवताना दिसत आहे.
-
हे फोटो मध्य प्रदेशातील सीहोरमधील आहेत. हे फोटो ‘सचिन तेंडुलकर फाउंडेशन’ चे आहेत.
-
‘सचिन तेंडुलकर फाउंडेशन’ ही संस्था समाजसेवेअंतर्गत देशाच्या विविध भागात वेगवेगळ्या उद्देशाने समाज कार्य करते. सचिन व्यतिरिक्त त्याची पत्नी अंजली, मुलगी सारा आणि मुलगा अर्जुन हे देखील या फाउंडेशनसाठी काम करतात.
-
या फोटोंमध्ये सारा आणि अंजली मुलांना शिकवताना दिसत आहे.
-
साराने हे फोटो पोस्ट करत कॅप्शन लिहिले आहे, “मला माझ्या आयुष्याचे पहिले वर्ष माझ्या आजोबांसोबत घालवण्याची संधी मिळाली होती, मी त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या शिक्षणाबद्दलच्या अनेक गोष्टी ऐकून मोठी झाले”.
-
सारा तिच्या आजोबांबद्दल सांगते की, “प्राध्यापक म्हणून त्यांचा असा विश्वास होता की शिक्षणामध्ये अमर्याद संधी उघडण्याची शक्ती आहे. मध्य प्रदेशातील सीहोर जिल्ह्यातील सेवा कुटीरला भेट दिल्याने मला त्यांचा या वाक्याचा अर्थ समजण्यास मदत झाली.”
-
साराने पुढे लिहिले की, “शिक्षणाव्यतिरिक्त, एसटीएफद्वारे सेवा कुटीर मुलांना दिवसातून दोनवेळा पौष्टिक जेवण पुरवतात आणि स्थानिक समुदायासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करतात. येथील समुदायाच्या पाठिंब्याच्या प्रभावाने मला खरोखरच या फाउंडेशनचा एक भाग असल्याचा अभिमान वाटतो.”
-
सचिन तेंडुलकर फाऊंडेशनने सीहोर जिल्ह्यातील नयापुरा, खापा, बेलपाटी, जामुंझील आणि सेवानिया कॉटेज दत्तक घेतले आहेत. या कॉटेजमध्ये ३ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांना शिक्षण, भोजन आणि इतर सुविधा पुरविल्या जातात. (फोटो: सचिन तेंडुलकर फाउंडेशन/इन्स्टाग्राम)
Pahalgam Terror Attack : गोळीबार सुरू होताच झाडावर चढून केलं संपूर्ण हल्ल्याचं रेकॉर्डिंग; स्थानिक व्हिडीओग्राफर बनला NIAचा प्रमुख साक्षीदार