-
सूर्यकुमारबद्दल बोलायचे झाले, तर तो २०२२ टी-२० वर्ल्ड कपपासून २४ सामने खेळला आहे आणि तीन शतके झळकवली आहेत. २०२२ च्या टी-२० विश्वचषकानंतर या फॉरमॅटमध्ये टीम इंडियासाठी सूर्या सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने २४ सामन्यांत ५१ च्या सरासरीने आणि १५६.२९ च्या स्ट्राईक रेटने ९६९ धावा केल्या आहेत. सूर्याने तीन शतकांव्यतिरिक्त सात अर्धशतकेही केली आहेत. नाबाद ११२ ही सूर्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.








