दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत पोहोचताच केला मोठा विक्रम, टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासात ही कामगिरी करणारा ठरला पहिला संघ
२४ जून रोजी दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिजचा सामना पार पडला. या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने ३ विकेट राखून वेस्ट इंडिज संघाचा पराभव केला आणि टी-२० विश्वचषक २०२४ च्या उपांत्य फेरीत प्रवेश केले.
२४ जून रोजी दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिजचा सामना पार पडला. या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने ३ विकेट राखून वेस्ट इंडिज संघाचा पराभव केला आणि टी-२० विश्वचषक २०२४ च्या उपांत्य फेरीत प्रवेश केले. (फोटो : दक्षिण आफ्रिका अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
हा सामना सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळला गेला होता. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सामन्यात वेस्ट इंडिजने २० षटकात ८ विकेट गमावत १३५ धावा केल्या. (फोटो : दक्षिण आफ्रिका अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
पावसमुळे सामन्यातील षटके कमी झाल्या आणि दक्षिण आफ्रिकेला डीएलएस पद्धतीच्या आधारे विजयासाठी १७ षटकांत १२३ धावांचे लक्ष्य मिळाले. (फोटो : दक्षिण आफ्रिका अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
दक्षिण आफ्रिकेने १६.१ षटकात ७ गडी गमावून १२४ धावा करून लक्ष्य गाठले. (फोटो : दक्षिण आफ्रिका अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
दक्षिण आफ्रिकेने तब्बल १० वर्षांनंतर टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. (फोटो : दक्षिण आफ्रिका अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
या आवृत्तीतील दक्षिण आफ्रिकेचा हा सलग ७ वा विजय आहे आपल्या या विजयासह संघाने ऑस्ट्रेलियाचा १४ वर्षांचा विक्रम मोडला. (फोटो : दक्षिण आफ्रिका अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
२०२१ साली टी-२० विश्वचषकात ऑस्ट्रेलिया संघाने सलग ६ विजयाचा विक्रम आपल्या नावी केला आणि यंदा २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेने सलग ७ सामने जिंकत हा विक्रम मोडला. (फोटो : दक्षिण आफ्रिका अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यामध्ये वेस्ट इंडिजच्या पराभावानंतर ते अमेरिकेसह टी-२० विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. (फोटो : वेस्ट इंडिज अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
Web Title: South africa made a big record as they reached the semi finals becoming the first team in the history of the t20 world cup to achieve this feat arg 02