-
१९ नोव्हेंबर २०२३ रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय संघाला एकदिवसीय विश्वचषकावर स्वतःचे नाव कोरता आले नव्हते. त्यावेळी भारतीय संघाच्या खेळाडूंची भेट घेऊन पंतप्रधान मोदींनी सांत्वन केले होते.
-
त्या दिवसाच्या कटू आठवणी मागे टाकून भारतीय संघाने काही महिन्यातच २९ जून २०२४ रोजी १७ वर्षांनंतर आयसीसीचा टी-२० विश्वचषक जिंकला. हा विश्वचषक जिंकून भारतीय संघाने संपूर्ण देशाला विजयाचा आनंद दिला.
-
आज ४ जुलै रोजी क्रिकेट संघ बार्बाडोसहून भारतात परतल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली.
-
या भेटीदरम्यान प्रत्येक खेळाडूशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपुलकीने संवाद साधला. पराभवाचे मळभ झटकून टाकत पुन्हा नव्या उमेदीने उभे राहत विजय मिळविणाऱ्या संघाचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केले.
-
दरम्यान बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शाह यांनी पंतप्रधान मोदींना क्रमांक १ ची ‘नमो’ या नावाची जर्सी प्रदान केली.
-
अंतिम सामन्यात महत्त्वाचा झेल पकडून भारताचा विजय सोपा करणाऱ्या सुर्यकुमार यादवनेही सपत्नीक मोदींची भेट घेतली.
-
भारताचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि त्याची पत्नी संजना गणेशननेही पंतप्रधान मोदींची भेट घेतली.
-
भारताचा अष्टपैली खेळाडू हार्दिक पंड्याने पंतप्रधान मोदींची भेट घेतली. आयपीएलच्या कटू आठवणी मागे टाकत पंड्याने विश्वचषकात बहारदार खेळ केला होता.
-
ऋषभ पंतने अपघातातून सावरत यंदाचा आयपीएल आणि विश्वचषकात महत्त्वाच्या क्षणी चांगली खेळी केली. त्यानेही पंतप्रधान मोदींची भेट घेतली.
-
दरम्यान आज भारतीय संघाच्या मुंबईतील विजयी मिरवणुकीसाठी गुजरातहून बस आणल्यामुळे विरोधकांकडून टीका होत आहे. महाराष्ट्रात बेस्टची ओपन बस असताना बाहेरच्या राज्यातून बस का आणली? हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”