-
वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर टीम इंडिया ४ जुलैला सकाळी मायदेशी परतली. यावेळी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि संघाने सर्वप्रथम राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
-
यावेळी पंतप्रधानांनी संघाचे तोंडभरुन कौतुक करत प्रोत्साहन दिले.
-
यानंतर टीम इंडिया थेट विमानाने मुंबईत पोहोचली. जिथे लाखो लोकांनी मुंबईत त्यांचे जोरदार स्वागत केले. मुंबईतील परेडमध्ये सहभागी होऊन संघ वानखेडे स्टेडियमवर पोहोचला.
-
यावेळी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याची आई देखील स्टेडियममध्ये पोहचेली. डॉक्टरांची अपॉईंमेंट सोडून माऊली लेकाला खूप दिवसांनंतर पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आली होती.
-
यावेळी आईने आपल्या लाडक्या लेकाला मिठा मारत, गालावार, कपाळावर प्रेमाने चुंबन घेतले. लेकाच्या डोक्यावरुन मायेने हात फिरवत त्याला कुरवाळले.
-
यावेळी त्याचे वडीलही तिथे उपस्थित होते. प्रत्येक भारतीयाप्रमाणे रोहितच्या आई-वडिलांसाठी देखील हा एक अभिमानाचा क्षण होता.
-
रोहित शर्माची आई पूर्णिमा यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “मी कधीच विचार केला नव्हता की मी एक दिवस हा दिवस पाहीन.”
-
T20 विश्वचषकापूर्वी रोहित आमच्याशी बोलला, यावेळी तो म्हणाला की, “त्याला T20 क्रिकेट सोडायचे आहे. पण मी त्याला फक्त जिंकण्यासाठी प्रयत्न कर असे सांगितले.”
-
“माझी तब्येत ठीक नसल्याने मी डॉक्टरांची अपॉईंमेंट घेतली होती, पण ती सोडून मी आले कारण मला त्याला समोरून पहायचे होते, मुलाच्या यशाचा आनंद घ्यायचा होता. मी खरंच माझा आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही.”
-
विश्वचषक विजयानंतर रोहित शर्माची आई पूर्णिमा शर्मा यांनीही सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केली होती.
-
विश्वचषक विजयानंतर रोहित शर्माची आई पूर्णिमा शर्मा यांनीही सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केली होती. ज्यामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा एकत्र दिसले होते.
-
या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले होते की, “टी-२० क्रिकेटची GOAT जोडी.खांद्यावर लेक, पाठिशी देश आणि शेजारी भाऊ.”
-
रोहित शर्माच्या आईने ही पोस्ट फक्त खास रोहितसाठी केली आहे. ज्याने आपल्या नेतृत्वाखाली भारताला पहिला विश्वचषक जिंकून दिला. (photo – social media)
Kunal Kamra Controversy : “मी जिथे राहत नाही तेथे जाणं म्हणजे…”; कुणाल कामराची सूचक पोस्ट, मुंबई पोलिसांना डिवचलं?