-
रोहित शर्मा
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा भारतासाठी सर्वात वेगवान शतक झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या स्थानी आहे. नुकतीच टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेल्या रोहित शर्माने २०१७ मध्ये इंदूरमध्ये श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात ३५ चेंडूत झंझावाती शतक पूर्ण केले. (फोटो-बीसीसीआय) -
सूर्यकुमार यादव
भारताचा टी-२० मधील सर्वाेत्कृष्ट फलंदाज असलेला सूर्यकुमार यादवने २०२३ मध्ये श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात ४५ चेंडूत शतक झळकावले होते. (फोटो-बीसीसीआय) -
केएल राहुल
रोहित सूर्यकुमारनंतर या यादीत केएल राहुल तिसऱ्या स्थानी आहे. ज्याने २०१६ मध्ये वेस्ट इंडिजविरूद्धच्या सामन्यात ४६ चेंडूत शतक पूर्ण केले होते. (फोटो-लोकसत्ता संग्रहित फोटो) -
अभिषेक शर्मा
तर केएल राहुलबरोबर आता या यादीत तिसऱ्या स्थानी अभिषेक शर्माचे नावही जोडले गेले आहे. ज्याने सध्या सुरू असलेल्या झिम्बाब्वेविरूद्धच्या सामन्यात ४६ चेंडूत शतक झळकावले. (फोटो-बीसीसीआय) -
सूर्यकुमार यादव
भारतासाठी वेगवान शतक करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पुन्हा एकदा चौथ्या स्थानी आहे. सूर्याने २०२२ मध्ये इंग्लंडविरूद्ध सामन्यात ४८ चेंडूत शतकी कामगिरी केली होती. (फोटो-बीसीसीआय) -
यशस्वी जैस्वाल
सूर्यकुमारसह या यादीत ४८ चेंडूत शतक झळकावणारा यशस्वी जैस्वालही आहे. यशस्वीने एशियन गेम्समधील उपांत्यपूर्व फेरीतील नेपाळविरूद्धच्या सामन्यात ४८ चेंडूत शतक पूर्ण केले होते. (फोटो-बीसीसीआय)

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य