-
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा काल ४३ वा वाढदिवस झाला. महेंद्रसिंग धोनीने क्रिकेट विश्वात अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. (इंडियन एक्सप्रेस)
-
महेंद्रसिंग धोनीची गणना जगातील सर्वोत्तम फिनिशर आणि यष्टीरक्षकांमध्ये केली जाते. पण फार कमी लोकांना माहित आहे की सुरुवातीला त्याला क्रिकेटर बनायचे नव्हते. (इंडियन एक्सप्रेस)
-
महेंद्रसिंग धोनीला लहानपणी क्रिकेटर होण्यात रस नव्हता. सुरुवातीला माहीला फुटबॉल खेळण्याची आवड होती आणि त्याला गोलकीपर बनायचे होते. मात्र, शाळेच्या क्रिकेट प्रशिक्षकांनी त्याला क्रिकेट खेळण्यासाठी प्रेरित केले. (इंडियन एक्सप्रेस)
-
यानंतर त्याचा क्रिकेटकडे कल वाढला आणि तो या खेळाचा सर्वात मोठा तारा म्हणून उदयास आला. (इंडियन एक्सप्रेस)
-
धोनीला लष्कराबद्दलही खूप आपुलकी आहे. त्याने अनेकवेळा सांगितले आहे की भारतीय सैन्यात भरती होण्याचे त्यांचे लहानपणापासूनचे स्वप्न होते. २०११ मध्ये धोनीला भारतीय सैन्यात मानद लेफ्टनंट कर्नल देखील बनवण्यात आले. (इंडियन एक्सप्रेस)
-
महेंद्रसिंग धोनी २०१५ साली आग्रा येथील भारतीय सैन्याच्या पॅरा रेजिमेंटमधून पॅरा जंप करणारा पहिला खेळाडू ठरला. त्याने सुमारे १५ हजार फूट उंचीवरून पाच उड्या मारल्या होत्या, त्यापैकी एक रात्रीच्या अंधारातही मारली होती. (इंडियन एक्सप्रेस)
-
तीनही आयसीसी ट्रॉफी जिंकणारा महेंद्रसिंग धोनी हा पहिला भारतीय कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने २००७ टी-२० विश्वचषक, २०११ विश्वचषक आणि २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. (इंडियन एक्सप्रेस)
-
भारतीय क्रिकेट संघाच्या यशस्वी माजी कर्णधाराला, आपल्या लाडक्या माहीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊयात. (इंडियन एक्सप्रेस)

गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्यावर चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले ‘पहलगामच्या घटनेचे…’