-
वयाच्या २१ व्या वर्षी स्पेनचा युवा टेनिसपटू कार्लोस अल्काराझने इतिहास रचला आहे. २१ वर्षीय कार्लोस अल्काराजने विम्बल्डन २०२४ फायनल सामन्यात नोव्हाक जोकोविचचा पराभव करून दुसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावले.
-
आता कार्लोस अल्काराझ वयाच्या २२ वर्षापूर्वी दोन विम्बल्डन विजेतेपद जिंकणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. कार्लोस अल्काराझच्या आधी टेनिस दिग्गज बोरिस बेकर आणि ब्योर्न बोर्ग यांनी हा पराक्रम केला होता.
-
कार्लोस अल्काराझने २०२२ मध्ये यूएस ओपनच्या रूपाने आपल्या कारकिर्दीतील पहिले ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले. यानंतर कार्लोस अल्काराझने २०२३ मध्ये पहिले विम्बल्डन विजेतेपद पटकावले.
-
कार्लोस अल्काराझने या वर्षी फ्रेंच ओपनचे विजेतेपदही जिंकले आणि आता २०२४ मध्ये त्याने दुसरे विम्बल्डन विजेतेपद पटकावले आहे. वयाच्या २१ व्या वर्षी कार्लोस अल्काराझने एकूण ४ ग्रँडस्लॅम जिंकले आहेत.
-
कार्लोस अल्काराझच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर ते खूपच मनोरंजक आहे. कार्लोस अल्काराझच्या गर्लफ्रेंडचे नाव मारिया गोन्झालेझ आहे.
-
मारिया गोन्झालेझ ही देखील टेनिसपटू आहे. कार्लोस अल्काराझ आणि मारिया गोन्झालेझ हे बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत.
-
कार्लोस आणि मारिया गोन्झालेझ हे स्पेनमधील एकाच शहरातील रहिवासी आहेत. तरी, त्यांच्या नात्याची पुष्टी झालेली नाही.

मराठी बोलण्यास नकार दिल्यामुळं बेळगावमध्ये वाहकाला मारहाण; महाराष्ट्र-कर्नाटक बस सेवा बंद