-
T२० विश्वविजेत्या भारतीय संघाचा ऑल राऊंडर खेळाडू असलेला हार्दिक पांड्या काल १५ जुलै रोजी त्याच्या गुजरातमधील वडोदरा या मूळ गावी पोहोचला. मोठ्या संख्येने जमलेल्या हार्दिकच्या चाहत्यांनी त्याचे जंगी स्वागत केले. (EXPRESS PHOTO – BHUPENDRA RANA)
-
वडोदरा शहरात ओपन बसमध्ये रोड शो आयोजित करण्यात आला होता. या रोड शोमध्ये हार्दिक पांड्याचे कुटुंबीयही सामील झाले होते. (EXPRESS PHOTO – BHUPENDRA RANA)
-
दरम्यान, यावेळी हार्दिक पांड्या भारतीय संघाच्या निळ्या जर्सीत दिसला. (EXPRESS PHOTO – BHUPENDRA RANA)
-
हार्दिकसोबत त्याचा भाऊ आणि क्रिकेटर कृणाल पांड्याही उपस्थित होता. (EXPRESS PHOTO – BHUPENDRA RANA)
-
भारतीय संघाला चॅम्पियन बनवण्यात संघाचा उपकर्णधार असलेल्या हार्दिक पंड्याचं योगदानही कौतुकास्पद ठरलं आहे. (EXPRESS PHOTO – BHUPENDRA RANA)
-
हार्दिक पांड्याने या विश्वचषकात अष्टपैलू खेळाडू म्हणून चमकदार कामगिरी केली आणि भारताला चॅम्पियन बनवण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावली. (EXPRESS PHOTO – BHUPENDRA RANA)
-
वडोदरा येथे पोहोचल्यानंतर हार्दिक पांड्याचे स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने क्रिकेट चाहते रस्त्यावर उतरले होते आणि सर्वत्र भारताचा ध्वज फडकवत जल्लोष साजरा करत होते. (EXPRESS PHOTO – BHUPENDRA RANA)
-
या दरम्यान, क्रिकेट चाहते आपल्या स्टार खेळाडूला पाहण्यासाठी आतुर झाले होते. यादरम्यान हार्दिक पांड्याही उत्साहाने सर्व चाहत्यांच्या आनंदात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. (EXPRESS PHOTO – BHUPENDRA RANA)
-
यंदाच्या T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये हार्दिक पांड्या आठ सामने खेळला. या सामन्यांच्या सहा डावांमध्ये ४८ च्या सरासरीने त्याने १४४ धावा केल्या, ज्यामध्ये एका अर्धशतकाचाही समावेश आहे. नाबाद ५० ही त्याची सर्वाधिक धावसंख्या होती. (EXPRESS PHOTO – BHUPENDRA RANA)
-
याशिवाय त्याने आठ सामन्यांमध्ये ११ विकेट्स घेतल्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अंतिम सामन्यात २० धावांत तीन बळी घेत हार्दिकने सर्वोत्तम कामगिरी केली. (EXPRESS PHOTO – BHUPENDRA RANA)
-
हार्दिकच्या वडोदरा येथील स्वागताचा आणखी एक फोटो. हेही वाचा- PHOTOS : डोनाल्ड ट्रम्प यांच्यापूर्वी अमेरिकेच्या ‘या’ अध्यक्षांवरही झाले आहेत जीवघेण (EXPRESS PHOTO – BHUPENDRA RANA)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख