-
भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांनी लग्नाच्या ४ वर्षानंतर दोघांच्या संमतीने घटस्फोट घेतला आहे. हार्दिक आणि नताशा यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर घटस्फोटाची घोषणा केली आहे. त्यांनी आपापल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एकत्रित निवेदन जारी करून विभक्त होण्याच्या त्यांच्या निर्णयाची पुष्टी केली आहे.
-
हार्दिकने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “4 वर्षे एकत्र राहिल्यानंतर, नताशा आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एकत्र राहण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि त्यासाठी सर्वकाही केले. आता आम्हाला वाटते की वेगळे होणे आमच्या दोघांच्या हिताचे आहे. “
-
पोस्टमध्ये तो म्हणाला, “नताशा आणि माझ्यासाठी हा एक कठीण निर्णय होता. आम्ही एक कुटुंब म्हणून राहण्याचा आनंद लुटला, एकमेकांचा आदर केला आणि एकमेकांना पाठिंबा दिला. आता अगस्त्य आमच्या दोघांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू आहे आणि पुढेही राहील.”
-
पोस्टमध्ये त्यांनी पुढे लिहिले की, “आम्ही एकमेकांना पूर्ण पाठिंबा देऊ जेणेकरुन आम्ही आमचा मुलगा अगस्त्यसाठी सर्व काही करू शकू, ज्यामुळे तो आनंदी राहिव. आम्ही सर्वांना विनंती करतो की या संवेदनशील प्रसंगी आम्हाला गोपनीयता द्यावी.”
-
हार्दिक आणि नताशा यांच्यात घटस्फोटाच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून येत होत्या, त्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता त्या संपुष्टात आल्या आहेत. हार्दिक आणि नताशाचे लग्न २०२० मध्ये झाले होते. दोघेही पहिल्यांदा २०१८ मध्ये एका नाईट क्लबमध्ये भेटले होते. दोघांचे अनेक कॉमन मित्र होते.
-
या काळातील किस्सा खुद्द हार्दिकनेच सांगितला होता. तो म्हणाला होता, “नताशाला मी कोण आहे याची कल्पना नव्हती. तिने मला एका टोपीमध्ये पाहिले होते जिथे आम्ही भेटलो होतो. मी रात्री एक वाजता टोपी, गळ्यात चेन आणि हातात घड्याळ घालून बसलो होतो. तेव्हापासून आम्ही एकमेकांशी बोलू लागलो होतो.
-
यानंतर, ६ वर्षांपूर्वी हार्दिने मुंबईत त्याच्या वाढदिवसाची पार्टी दिली होती, ज्यामध्ये नताशा देखील सहभागी झाली होती. इथून दोघांमध्ये मैत्री झाली आणि हळूहळू ते एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र, २०२० पूर्वी या दोघांनी कधीही त्यांच्या नात्याचा खुलासा केला नाही.
-
त्यानंतर या जोडप्याने २०२० मध्ये त्यांच्या इंगेजमेंटचा घोषणा केली. १ जानेवारी २०२० रोजी एका क्रूझ पार्टीत हार्दिकने नताशाशी लग्न केले. यानंतर, त्यांनी कोविड काळात ३१ मे २०२० रोजी कोर्टात लग्न केले. ३० जुलै २०२० रोजी हे जोडपे त्यांच्या मुलाचे म्हणजे अगस्त्यचे पालक झाले.
-
यानंतर २०२३ मध्ये नताशा आणि अगस्त्याचे भव्य लग्न झाले. त्यांनी १४ फेब्रुवारी २०२३ रोजी ख्रिश्चन आणि हिंदू पद्धतीने दोनदा लग्न केले. या जोडप्याचा २ वर्षांचा मुलगाही लग्नाला उपस्थित होता. पण मार्च २०२४ मध्ये त्यांच्या विभक्त होण्याच्या बातम्या येऊ लागल्या.
-
नताशाने तिच्या इन्स्टाग्रामवरून पंड्या आडनाव काढून टाकल्यावर या अफवा सुरू झाल्या. यानंतर नताशाने हार्दिकबरोबरचे तिचे फोटोही डिलीट केले. मात्र, काही दिवसांनी तिन्ही ते पुन्हा शेअर केले. यामुळे दोघांनाही खूप ट्रोल व्हावे लागले. पण त्यानंतर घटस्फोटाची घोषणा होण्यापूर्वी नताशा मुलगा अगस्त्याबरोबर सर्बियाला गेली आणि आता दोघांनीही एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
(फोटो स्त्रोत: @hardikpandya93/instagram)

Pahalgam Terror Attack : गोळीबार सुरू होताच झाडावर चढून केलं संपूर्ण हल्ल्याचं रेकॉर्डिंग; स्थानिक व्हिडीओग्राफर बनला NIAचा प्रमुख साक्षीदार