-
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये जगभरातील खेळाडू सहभागी झाले आहेत. काही खेळाडूंना त्यांच्या मेहनतीचे फळ येथे मिळत आहे तर काही कमी मेहनतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडत आहेत.
-
दरम्यान, यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये एक थक्क करणारी गोष्ट घडली आहे. इजिप्तची महिला तलवारबाज नादा हाफेज गर्भवती असूनही पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली.
-
इतकंच नाही तर तिने काही सामन्यांमध्ये यश देखील मिळवले. नादाची यासंबंधीची सोशल मीडिया पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत आहे.
-
हाफेझने स्पर्धेदरम्यान अमेरिकेच्या एलिझाबेथ टार्टाकोव्स्कीचा 15-13 अशा फरकाने पराभव केला. मात्र, तिच्या पुढच्या सामन्यात तिला दक्षिण कोरियाच्या जिओन हयांगविरुद्ध पराभव पत्करावा लागला. येथे तिला 15-7 या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला.
-
टूर्नामेंटमधून बाहेर पडल्यानंतर 26 वर्षीय महिला नादाने आपले विचार मांडले आहेत. इन्स्टाग्रामवर तिने काही फोटो शेअर करत भावनिक पोस्ट लिहिली आहे.
-
नादाने या पोस्टमध्ये म्हटलं आहे, “माझ्या गर्भात भविष्यातील लहानगा ऑलिम्पियन वाढत आहे. या स्पर्धेत, मी आणि माझ्या बाळाने आमच्या शारीरिक किंवा मानसिक आव्हानांचा एकत्रित सामना केला.”
-
आपला मुद्दा पुढे नेत ती म्हणाली, “गर्भधारणा हा खूप कठीण मार्ग आहे. जीवन आणि खेळ यांच्यात समतोल राखणे हे खूप आव्हानात्मक काम होते.”
-
“मी हे पोस्ट करत आहे कारण स्पर्धेदरम्यान 16 च्या फेरीत पोहोचणे ही एक मोठी गोष्ट आहे.”
-
नादा हाफेझ म्हणाली, “तुम्ही दोन खेळाडूंना व्यासपीठावर पाहत होता, पण प्रत्यक्षात तेथे तीन स्पर्धक होते. मी, माझा स्पर्धक आणि माझे बाळ”
-
हाफेझने स्पर्धेदरम्यान अमेरिकेच्या एलिझाबेथ टार्टाकोव्स्कीचा 15-13 अशा फरकाने पराभव केला. मात्र, तिच्या पुढच्या सामन्यात तिला दक्षिण कोरियाच्या जिओन हयांगविरुद्ध पराभव पत्करावा लागला. येथे तिला 15-7 या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. (नादा हाफेज/इन्स्टाग्राम)
‘गंगू तारुण्य तुझं बेफाम, गं जसा इश्काहचा ऍटम बाम’ आजीपुढं तरुणाई फिकी पडली; जबरदस्त डान्सचा VIDEO झाला व्हायरल