-
भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने २०२४ पॅरिस ऑलिम्पिकमधील ५० किलो कुस्ती स्पर्धेत सहभागी झाली आहे.
-
ऑलिम्पिकमधील ५० किलो कुस्तीच्या उपांत्य फेरीत विनेश फोगटचा सामना क्युबाच्या युस्नेलिस गुझमन लोपेझशी झाला आणि या सामन्यात विनेश फोगटने ५-० असा विजय मिळवला आणि अंतिम फेरी गाठली.
-
विनेश फोगटच्या वैयक्तिक जीवनाबाबत बोलायचे झाले तर, विनेश फोगट आणि सोमवीर राठी यांच्या प्रेमकथेची सुरुवात कुस्तीच्या आवडीपासून झाली.
-
पुढे रेल्वेसाठी एकत्र काम करत असताना त्यांची मैत्री घट्ट झाली आणि २०१८ मध्ये विनेश आणि सोमवीर लग्नबंधनात अडकले.
-
विनेशच्या आयुष्यात सोमवीरची भूमिका पती असण्यापलीकडे एक कुस्ती सहायक म्हणूनही आहे. सोमवीरची कुस्तीबद्दल असलेली सखोल माहिती विनेशसाठी महत्त्वाची ठरली आहे.

