-
वेटलिफ्टिंगच्या संपूर्ण स्पर्धेत सातत्याने पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या स्थानी असलेली मीराबाई चानू अखेरच्या क्षणी चौथ्या स्थानी आली. मीराबाई अखेरची संधी असलेलं वेटलिफ्ट करू न शकल्याने ती चौथ्या स्थानी राहिली. फक्त एक किलोच्या फरकामुळे तिचे कांस्यपदक हुकले.
-
ऐतिहासिक दोन ऑलिम्पिक पदकं जिंकलेल्या मनू भाकेरचे पॅरिस ऑलिम्पिकमधील तिसरे पदक हुकले. २५ मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत ती चौथ्या स्थानी राहिली.
-
लक्ष्य सेनला बॅडमिंटन एकेरीमधील कांस्यपदकाच्या सामन्यात २१-१३, १६-२१, ११-२१ असा मलेशियाच्या ली झी जियाकडून पराभव पत्करावा लागला आणि तो चौथ्या स्थानावर राहिला.
-
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर रायफल स्पर्धेतील अंतिम फेरीत अवघ्या गुणांच्या फरकाने तो चौथ्या स्थानी राहिला. त्यामुळे अर्जुन बाबुताने पदक गमावले.
-
भारतीय तिरंदाज अंकिता भकट आणि धीरज बोम्मादेवरा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब्रॅडी एलिसन आणि केसी कॉफहोल्ड यांच्याविरुद्ध तिरंदाजी स्पर्धेच्या कांस्यपदकाच्या लढतीत पराभूत झाल्याने भारताचे कांस्यपदक हुकले.
-
पॅरिस ऑलिम्पिकमध्य भारताचे नेमबाज माहेश्वरी चौहान, अनंत नारुका यांना कांस्यपदकाच्या लढतीत स्कीट मिश्र प्रकारात चीनकडून अवघ्या एका गुणाच्या फरकाने पराभव पत्करावा लागला.
-
भारताला सर्वात मोठा धक्का बसला तो म्हणजे विनेश फोगटला अपात्र घोषित केल्याने, अतिरिक्त वजनामुळे पदकाची खात्री असलेल्या विनेश फोगटला अपात्र ठरवल्याने ती स्पर्धेतून बाहेर पडली. (सर्व फोटो-इंडियन एक्सप्रेस)

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स