-
कुस्तीपटू विनेश फोगटचे आज दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आले. (Express Photo by Gajendra Yadav)
-
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना विनेश म्हणाली, “माझ्या लढ्यात माझ्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल मला देशातील लोकांचे आभार मानायचे आहेत, आमची लढाई अजून संपलेली नाही.” (Express Photo by Gajendra Yadav)
-
यावेळी खेळाडू बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि इतर अनेक कुस्तीपटूंनी विनेशचे स्वागत केले. (Express Photo by Gajendra Yadav)
-
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत महिलांच्या ५० किलो वजनी गटाच्या कुस्तीच्या सुवर्णपदकाच्या सामन्यापूर्वी विनेश १०० ग्रॅम जास्त वजनामुळे अपात्र ठरली होती. (Express Photo by Gajendra Yadav)
-
सुवर्णपदकाच्या लढतीपूर्वी विनेशला अपात्र ठरवण्यात आले तेव्हा भारतीय ऑलिम्पिक संघटनेने त्यावर तीव्र आक्षेप नोंदवला होता. (Express Photo by Gajendra Yadav)
-
या प्रकरणाबाबत, २९ वर्षीय कुस्तीपटू विनेशने सामायिक रौप्य पदक देण्यासाठी क्रीडा लवादाच्या न्यायालयाकडेही अपील केले होते, परंतु १४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी तिची याचिका सीएएसने फेटाळली आहे. (Express Photo by Gajendra Yadav)
-
पॅरिस ऑलिम्पिकमधून कोणतेही पदक न मिळवता विनेश फोगट जेव्हा भारतात परतली तरीही तिचे जोरदार स्वागत होत असल्याचे पाहून तिला अश्रू अनावर झाले आणि ती भावुक झाली. (Express Photo by Gajendra Yadav)
-
“विनेश देशात परतली आहे. तिचे स्वागत करण्यासाठी लोक इथे (दिल्ली) विमानतळावर आले आहेत. आमच्या घरी आणि गावातही तिचे स्वागत करण्यासाठी लोक वाट पाहत आहेत. लोक विनेशला भेटून तिला प्रोत्साहन देण्यासाठी उत्सुक आहेत,” असे तिचा भाऊ हरविंदर फोगट यावेळी म्हणाला. (Express Photo by Gajendra Yadav)

Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश