-
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह त्याची लेकही सर्वांच्या परिचयाची आहे. त्याची मुलगी झिवा सिंग धोनी देखील स्टारकिडपेक्षा कमी नाही. झिवा अनेकदा तिच्या वडिलांसोबत वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थित असते. (फोटो स्रोत: @ziva_singh_dhoni/instagram)
-
२०१५ मध्ये जन्मलेल्या झिवाचे इन्स्टाग्रामवर सुमारे २.८ मिलियन फॉलोअर्स आहेत. पण धोनीची मुलगी झिवा कोणत्या शाळेत जाते आणि तिची फी किती आहे हे तुम्हाला माहिती आहे का? (फोटो स्रोत: @ziva_singh_dhoni/instagram)
-
झिवा ९ वर्षांची असून ती रांचीमधील सर्वात महागड्या शाळेत म्हणजेच ‘टॉरियन वर्ल्ड स्कूल’मध्ये चौथीच्या वर्गात शिकत आहे. ही शाळा रांचीमधील TWS इंटरनॅशनल स्कूल म्हणूनही ओळखली जाते, जी शहरातील सर्वात मोठ्या शाळांपैकी एक आहे.
-
‘टॉरियन वर्ल्ड स्कूल’ ही CBSE बोर्डाची शाळा आहे, ज्याची स्थापना अमित बजला यांनी २००८मध्ये केली होती. या शाळेत सर्व प्रकारच्या जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध आहेत.
-
अभ्यासाव्यतिरिक्त, क्रीडा आणि कला यासह अनेक अभ्यासेतर उपक्रमही शाळेत आयोजित केले जातात. शाळेच्या परिसरात सेंद्रिय शेतीपासून अश्वारोहणापर्यंत सर्व सुविधा आहेत.
-
या शाळेच्या वेबसाइटवर दिलेल्या फी स्ट्रक्चर २०२४-२५ नुसार, एलकेजी ते ८ वी पर्यंतची वार्षिक फी २ लाख ६५ हजार रुपये आहे.
-
झिवा शिकत असलेल्या या शाळेतील इयत्ता दुसरी ते आठवी पर्यंतची फी २ लाख ९५ हजार रुपये आहे. तर इयत्ता ९वी ते १२वीची वार्षिक फी ३ लाख २५ हजार रुपये आहे.
-
या शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना बोर्डिंगमध्ये शिक्षण घ्यायचे असेल तर त्यांना एलकेजी ते ८पर्यंत ४ लाख ७० हजार रुपये फी भरावी लागणार आहे. तर ९वी ते १२वी पर्यंतची वार्षिक फी ५ लाख १० हजार रुपये आहे. (वरील सर्व फोटो: tws.edu.in)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख