-
क्रिकेटपटू रोहित शर्मा हा देशातच नाही तर जगभरात लोकप्रिय आहे. त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. अशातच क्रिकेटबरोबरच रोहित त्याच्या वैयक्तिक आयुष्यात काय करतो हे जाणून घेण्यासाठीही चाहते उत्सुक असतात. (AP)
-
रोहित शर्मा हा भारताच्या कसोटी आणि एकदिवसीय संघाचा सध्याचा कर्णधार आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत आक्रमक फलंदाजी करत १९ हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. (AP Photo-Aijaz Rahi)
-
त्याची बॅट अनेकदा चर्चेत असते, ज्यावर ‘सीएट’ कंपनीचे स्टिकर अनेक वर्षांपासून दिसत आहे. रोहितला स्टिकर्स लावण्याचे पैसे मिळतात का? (AP)
-
रोहित शर्माला त्याच्या बॅटवर स्टिकर्स लावण्यासाठी किती पैसे मिळतात? हा करार किती वर्षांचा आणि किती कोटींचा आहे? आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया. (EXPRESS PHOTO – ABHINAV SAHA)
-
CEAT ही टायर उत्पादक कंपनी आहे. या कंपनीने २०१५ मध्ये रोहित शर्मासोबत पहिला करार केला होता. त्यानंतर रोहितच्या बॅटवर या कंपनीचा लोगो दिसत आहे. (AP/PTI)
-
वृत्तानुसार, ‘सीएटी’ कंपनी रोहित शर्माला बॅटवर स्टिकर्स लावण्यासाठी वार्षिक ४ कोटी रुपये देते. साधारणपणे, दोन्ही पक्षांमध्ये तीन वर्षांचा करार होतो आणि रोहितला एकूण १२ कोटी रुपये मिळत आहेत. (PTI Photo-Kamal Kishore)
-
विराट कोहलीच्या बॅटवर देखील ‘MRF’ या टायर बनवणाऱ्या कंपनीचा स्टिकर आहे. असे म्हटले जाते, विराटला एमआरएफकडून रोहित शर्मापेक्षा तिप्पट पैसे मिळतात. (Express Photo-Partha Paul)
-
रोहित शर्माने T20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, परंतु इतर सर्व फॉरमॅटमध्ये तो ‘CEAT’ स्टिकर असलेली बॅट घेऊन क्रिकेट खेळताना दिसत आहे. आयपीएलमध्येही तो याच बॅटने खेळतो. (AP Photo-Ramon Espinosa)

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य