-
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने नुकतेच सोशल मीडियावर त्याच्या फ्रेश हेयरकटचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये त्याचा लूक अप्रतिम दिसत आहे.
-
पण एक वर्षापूर्वी मोहम्मद शमीची टक्कल पडल्याची दिसत होती. सुमारे वर्षभरापूर्वी शमीच्या डोक्यावर केसही उरले नव्हते.
-
२०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यानही शमीच्या डोक्यावर खूपच कमी केस दिसत होते. मग अचानक शमीच्या केसांमध्ये कसा फरक पडला? त्याबद्दल जाणून घेऊया.
-
मोहम्मद शमीने काही महिन्यांपूर्वी हेअर ट्रान्सप्लांट केले होते ज्यामुळे आता त्याच्या डोक्यावर खूप दाट केस आहेत. त्यामुळे हेअर ट्रान्सप्लांट हे शमीच्या केसांचे रहस्य आहे.
-
उल्लेखनीय म्हणजे दुखापतीमुळे शमी बराच काळ टीम इंडियातून बाहेर आहे. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक फायनलमध्ये त्याने भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता.
-
फेब्रुवारी २०२४ मध्ये भारतीय वेगवान गोलंदाजाच्या पायाच्या घोट्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सध्या तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत रिहॅबिलिटेशनमधून जात आहे.
-
दरम्यान, मोहम्मद शमी आणि टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. मोहम्मद शमी भारतीय संघात कधी पुनरागमन करणार याची माहिती मिळाली आहे.
-
मोहम्मद शमी रणजी ट्रॉफीमध्ये बंगालसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची शक्यता आहे. यानंतर तो न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामना खेळू शकतो.
-
जे त्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनरागमन असेल. फिटनेस तपासण्यासाठी शमी आधी देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना दिसेल. यानंतर भारत येत्या काळात बऱ्याच कसोटी मालिका खेळणार आहे. ज्यासाठी शमी संघात असल्यास संघाला अधिक मदत मिळेल. (Photo Source – Mohammed Shami Insta)
शाळा बुडवून मुलगी बॉयफ्रेंडसोबत करत होती रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून सांगा काकांनी बरोबर केलं का?