-
फुटबॉलचा महान खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने अलीकडेच YouTube वर त्याचे चॅनल सुरू केले आहे. (Photo Source: @cristiano/instagram)
-
रोनाल्डो यूट्यूबवर येताच त्याने एकामागून एक अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. (Photo Source: @cristiano/instagram)
-
इंस्टाग्राम, एक्स आणि फेसबुकवर आधीच प्रचंड फॉलोअर्स असणाऱ्या रोनाल्डोने नुकतेच ‘यूआर ख्रिस्तियानो’ यूट्यूब चॅनल सुरू केले आहे. (Photo source: @cristiano/YouTube)
-
21 ऑगस्ट रोजी रोनाल्डोने त्याचे चॅनल सुरू केले आणि त्याच्या चाहत्यांना सबस्क्राईब करण्याचे आवाहन केले. असे करताच यूट्यूबवरील आधीचे सगळे रेकॉर्ड मोडले. (Photo source: @cristiano/YouTube)
-
रोनाल्डोने त्याचे यूट्यूब चॅनल उघडताच, काही मिनिटांतच त्याच्या सबस्क्राइबर्स सदस्यांची संख्या दहा लाख पार केली. चॅनेलने लॉन्च झाल्यानंतर पहिल्या 90 मिनिटांतच दहा लाख सबस्क्राइबर्सचा टप्पा गाठला. (Photo source: @cristiano/YouTube)
-
YouTube च्या इतिहासात कोणीही इतक्या जलद गतीने 1 मिलियन सदस्य मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. एवढेच नाही तर रोनाल्डोच्या चॅनलवरील सदस्यांची संख्या वाढतच चालली आहे. सध्या त्याच्या यूट्यूब चॅनलवर 42 मिलियन सबस्क्राइबर्स आहेत.(Photo source: @cristiano/YouTube)
-
सर्वात मोठी आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे चॅनल उघडल्यानंतर केवळ 22 मिनिटांत सिल्व्हर प्ले बटण, 90 मिनिटांत गोल्डन प्ले बटण आणि 12 तासांत डायमंड प्ले बटण त्याला मिळाले आहे. (Photo source: @cristiano/YouTube)
-
यूट्यूबकडून बटण मिळाल्यानंतर रोनाल्डोने हा आनंद त्याच्या मुलींसोबत शेअर केला. त्याने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो आपल्या मुलांसमोर यूट्यूब प्ले बटण दाखवताना दिसत आहे. (Photo Source: @cristiano/instagram)
-
दरम्यान, YouTube वरून तुम्हाला 1 लाख सब्सक्राइबर मिळाल्यावर सिल्व्हर प्ले बटण, 1 दशलक्ष म्हणजेच 10 लाख सब्सक्राइबर मिळाल्यावर गोल्ड प्ले बटण आणि 10 दशलक्ष म्हणजेच 1 कोटी (मिलियन) सबस्क्राइबर्स मिळाल्यावर डायमंड प्ले बटण मिळते. (Photo Source: @cristiano/instagram)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”