-
सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर ही सोशल मीडिया स्टार आहे.
-
वडिलांप्रमाणे, सारा देखील खूप लोकप्रिय आहे, विशेषतः तरुणांमध्ये.
-
इंस्टाग्रामवर तिचे ७१ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. कदाचित याच कारणामुळे सारा सोशल मीडियावर जे काही शेअर करते ते अल्पावधीतच व्हायरल होते.
-
सारा तेंडुलकरचे नाव अनेकदा भारतीय क्रिकेट संघाचा युवा क्रिकेटर शुबमन गिलसोबत जोडले जाते. सारा तेंडुलकरची नुकतीच जी पोस्ट व्हायरल झाली आहे, तिचं कनेक्शनही युजर्स शुबमन गिलसोबत जोडत आहेत.
-
खरं तर, सारा तेंडुलकरने इंस्टाग्राम स्टोरीवर अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. या व्हिडिओद्वारे तिने आपल्या चाहत्यांना माहिती दिली की ती सध्या लंडनमध्ये असून पंजाबी गायक करण औजलाचा तिने अटेंड केला आहे.
-
विशेष बाब म्हणजे ८ सप्टेंबर २०२४ रोजी शुबमन गिलचा २५ वा वाढदिवस होता. शुभमन गिलने त्याचे जवळचे मित्र इशान किशन, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्यासोबत वाढदिवस साजरा केला. यासंदर्भात शुभमन गिलचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. शुभमन गिल त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत करण औजलाचे १०० मिलियन गाणे गाताना दिसत आहे.
-
याशिवाय १० सप्टेंबर २०२४ रोजी सारा तेंडुलकरने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर अनेक फोटो पोस्ट केले आहेत. त्याच्या कॅप्शनमध्ये तिने पिकनिक डे असेही लिहिले. तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती लंडनच्या रॉयल पार्कपैकी एक असलेल्या रीजेंट्स पार्कमध्ये असल्याचे दिसत आहे आणि मित्रांसोबत क्वालिटी टाईम घालवत आहे.
-
एका चित्रात साराने खाण्यापिण्याचे पदार्थ दाखवले आहेत. त्यात Moet & Chandon ची बाटलीही दिसते आहे, हा एक वाईनचा एक ब्रँड आहे. पोस्टमध्ये एक व्हिडिओ देखील आहे, ज्यामध्ये ती तिच्या मित्रासोबत चेरी खात आहे. (Photos Source: Sara Tendulkar/Instagram)

Bill Gates on AI and Jobs : बहुतेक कामांमध्ये AI घेईल माणसांची जागा, फक्त ‘या’ तीन नोकऱ्या आहेत सुरक्षित : बिल गेट्स