-
भारतीय क्रिकेट संघ यावर्षी नोव्हेंबर मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे.
-
दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका बॉर्डर-गावस्कर करंडक म्हणून ओळखली जाते.
-
१९९१-९२ नंतर प्रथमच दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरू झाल्यानंतर यंदा प्रथमच दोन्ही संघ ५ सामन्यांची मालिका खेळणार आहेत.
-
त्याचे झाले असे की, १९४७-१९९६ या कालावधीत भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये ५० कसोटी सामने खेळले गेले. त्यानंतर १९९६ मध्ये या मालिकेचे नाव बदलून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी ठेवण्यात आले. महान भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि ऑस्ट्रेलियन माजी कर्णधार ॲलन बॉर्डर यांच्या उल्लेखनीय कामगिरीची नोंद घेत हे नाव देण्यात आले आहे.
-
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १९५६-५७ ते २०२२-२३ पर्यंत २८ कसोटी मालिका खेळल्या गेल्या आहेत. यातील ऑस्ट्रेलियाने १२ तर भारताने ११ मालिका जिंकल्या आहेत. एकूण ५ मालिका अनिर्णित राहिल्या आहेत.
-
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरू झाल्यापासून भारताने १० मालिका जिंकल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने पाच मालिका जिंकल्या आहेत. १९९६- ९७ ते २०२२-२३ पर्यंत फक्त एक कसोटी मालिका अनिर्णित राहिली आहे. २००३- ०४ मधील एक मालिका अनिर्णित राहिली होती.
-
भारताने मागील ५ बॉर्डर-गावस्कर मालिकापैकी ४ जिंकल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने २०१४- १५ पासून मालिका जिंकलेली नाही. भारताने सलग चार मालिका जिंकल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या मागील दोन्ही दौऱ्यांमध्ये संघाने मालिका जिंकली आहे.
-
२००० सालानंतर भारताने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी आठ वेळा जिंकली आहे. तर ऑस्ट्रेलियाने चार वेळा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली आहे. एक मालिका अनिर्णित राहिली आहे.
-
हेही वाचा-

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”